लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : माजीमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांच्या नेतृत्वातील पांढरकवडा ते दाभडी शेतकरी पदयात्रा शुक्रवारी येथे दाखल झाली. त्यानंतर जाहीर सभा घेण्यात आली.यासभेत भाजप सरकार लोकशाहीला धोका असून हे सरकार लोकशाही पायदळी तुडवित असल्याचा आरोप माजी खासदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. त्यांनी विविध घोटाळ्यांचा उल्लेख केला. माजीमंत्री अॅड. शिवाजीराव मोघे यांनी केंद्र व राज्य सरकार शेतकरी व जनतेला केवळ आश्वासने देऊन मोकळे होत असल्याचा आरोप केला. शेतकरी शासनाच्या धोरणांमुळे संकटात सापडले असून आत्महत्येत वाढ झाल्याचा दावा त्यांनी केला. दाभडी येथे मोदी यांनी आपल्या भाषणातून १९ आश्वासने दिली होती. त्यापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही असा आरोपही मोघे यांनी केला.या सभेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. वजाहत मिर्झा, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष बाबासाहेब गाडे, माधुरी अराठे, जीवन पाटील, अनिल आडे, जितेंद्र मोघे, शंकर बडे, साजिद बेग आरिज बेग, भारत राठोड, मारोती पवार, देविदास चवरे, जितेंद्रसिंग कोंघारेकर, सभापती सुरेश जयस्वाल, सिकंदर शहा, मोहन मामीडवार, राम देवसरकर, अमर पाटील, सुनील पाटील, डॉ. विजय कडू, माणिक मेश्राम, किशोर दावडा आदी उपस्थित होते.
काँग्रेसची पदयात्रा घाटंजीत दाखल, जाहीर सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 10:04 PM