घाटंजी येथे काँग्रेसचे तिरडी आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2018 10:31 PM2018-06-01T22:31:37+5:302018-06-01T22:31:37+5:30
वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शुक्रवारी तिरडी यात्रा काढून डफडी बजाओ आंदोलन करण्यात आले. येथील जलाराम मंदिरापासून तहसील कार्यालयावर तिरडी यात्रा काढण्यात आली. यात तिरडीसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
घाटंजी : वाढत्या महागाईच्या निषेधार्थ काँग्रेसतर्फे शुक्रवारी तिरडी यात्रा काढून डफडी बजाओ आंदोलन करण्यात आले.
येथील जलाराम मंदिरापासून तहसील कार्यालयावर तिरडी यात्रा काढण्यात आली. यात तिरडीसह काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले. डफडे वाजवित भाजप सरकारवर दोषारोप करीत मोर्चा तहसीलवर धडकला. तेथे धरणे देण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री अॅड.शिवाजीराव मोघे यांनी केले. केंद्र व राज्य सरकारच्या विविध धोरणांचा मोर्चेकऱ्यांनी निषेध केला. भाजप सरकारवर आसूड ओढले. नंतर विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. आंदोलनात बाबासाहेब गाडे, मारोतराव पवार, जितेंद्र मोघे, डॉ.विजय कडू, माणिक मेश्राम, देविदास चवरे, कृष्णा पुसनाके, वासुदेवराव महल्ले, मोरेश्वर वातीले, सहदेव राठोड, विद्याताई सलाम, सुभाष गोडे, नगरसेवक परेश कारिया, इकलाख खान, चंद्रकांत सोनटक्के, अंबादास राठोड, अॅड.विजय भुरे, प्रजय कडू, विजय जीवतोडे, मोहन भोयर, गणेश वल्लफवार, गणेश मुद्दलवार, अनिल राठोड, राजू निकोडे, गणेश उन्नरकर, प्रमोद राठोड, गौतम चौधरी, अजाबराव लेनगुरे, बळीराम पवार, कुडसिंग राठोड, अण्णाजी ढगले, बाबाराव आत्राम, विनोद मुनगिनवार, मनोज मेश्राम, अमृत पेंदोर, सुरेश कुडगावे, राजू मुनेश्वर, आनंदराव पडलवार, मोबिन खान, असलम कुरेशी आदी सहभागी झाले होते.