पुसद : लगतच्या श्रीरामपूर येथील बुद्ध विहारात संविधान घर स्थापन करण्यात आले.
भारतीय संविधानाची जनतेला माहिती व्हावी, या हेतूने विश्वदीप महाबोधी बुद्ध विहार समिती व सुजाता महिला मंडळाच्या वतीने बुद्ध विहारात संविधान घर स्थापन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बुद्ध विहार समितीचे सचिव प्रा. राधाकिसन गवई होते.
उद्घाटक म्हणून धम्मभूषण ॲड. आप्पाराव मैंद, तर प्रमुख पाहुणे म्हणून गोवर्धन मोहिते, सरपंच आशिष काळबांडे, ग्रामपंचायत सदस्य दिनेश राठोड, राहुल सहारे, पंचायत समिती सदस्य देवेंद्र खडसे, काशिनाथ मुनेश्वर, सुधाकर बनसोड, विहार समितीचे अध्यक्ष साहेबराव गुजर, के. के. दिघाडे उपस्थित होते.
प्रथम तथागत भगवान गौतम बुध्द व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सुजाता महिला मंडळाच्या भगिनींनी बुद्धवंदना घेतली. याप्रसंगी ॲड. आप्पाराव मैंद, गोवर्धन मोहिते, सुधाकर बनसोड आदींनी समयोचित विचार मांडले. तुकाराम चौरे यांनी सूत्रसंचालन केले. उपप्राचार्य पी. एम. दवणे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रमा दिघाडे, माया पाझारे, अनिता इंगोले, सुजाता दवणे, एकता खोडके, रंजना आळने, लता चौरे, शुभांगी वाकोडे, सुमित्रा पाटील, बेबी खडसे, सुनीता बहादुरे, दगडू कांबळे, सोपान वैराळे, सी. एल. आठवले, नागोराव कांबळे, दशरथ कांबळे, हरिभाऊ पाटील, यशवंत कांबळे, भीमराव गायकवाड, नारायण गायकवाड, भारत कांबळे, पुंडलिक भगत, एन. बी. पाईकराव, बबन कटके, एन. जी. खडसे आदींनी परिश्रम घेतले.