शहरं
Join us  
Trending Stories
1
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
2
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
3
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
4
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
5
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
6
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
7
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
8
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
9
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
11
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
12
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
13
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
14
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
15
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
16
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
17
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
18
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
19
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

बांधकाम अभियंत्यांना लागले पदोन्नतीचे वेध

By admin | Published: April 01, 2017 12:40 AM

सार्वजनिक बांधकाम खात्यातील उपअभियंते, कनिष्ठ अभियंत्यांना बढत्यांचे वेध लागले आहे. कारण ५ एप्रिल रोजी पदोन्नती समितीची (डीपीसी)

बुधवारी ‘डीपीसी’ : अनेकांची मोर्चेबांधणी यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्यातील उपअभियंते, कनिष्ठ अभियंत्यांना बढत्यांचे वेध लागले आहे. कारण ५ एप्रिल रोजी पदोन्नती समितीची (डीपीसी) बैठक होणार असून त्यात अभियंत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. जिल्ह्यात बांधकाम उपअभियंत्यांपैकी चार ते पाच जणांचा कार्यकारी अभियंता पदावरील पदोन्नतीच्या यादीत समावेश होण्याची शक्यता आहे. याशिवाय १८ कनिष्ठ अभियंत्यांना उपअभियंता म्हणून बढती दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या उपअभियंत्यांमध्ये पुसदचे रवींद्र मालवत, नेरचे तकी, पांढरकवड्याचे मनोहर सहारे तसेच यापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात सेवा दिलेले व सध्या अमरावती जिल्ह्यातील अचलपूर येथे कार्यरत असलेल्या शेंडगे आदींचा समावेश राहू शकतो. पुसदचे बांधकाम कार्यकारी अभियंता धोत्रे व एका भाजपा आमदाराचे बिनसले होते. त्यामुळे धोत्रे बदलीच्या मानसिकतेत होते. धोत्रे गेल्यास आपली पुसदला नियुक्ती करून घेण्याचे मालवत यांचे नियोजन होते. मात्र धोत्रेंची ‘तडजोड’ झाल्याने ते पुसदमध्येच रमले. त्यामुळे मालवत यांनी आता राष्ट्रीय महामार्ग क्र. २ अकोला येथे आपले लक्ष्य केंद्रीत केले आहे. तेथील कार्यकारी अभियंता मिथिलेश चव्हाण हेसुद्धा अधीक्षक अभियंता पदावरील बढतीच्या प्रतीक्षेत आहेत. ही बढती मिळाल्यास त्यांचा यवतमाळसाठी ‘इन्टरेस्ट’ राहू शकतो. येथील अधीक्षक अभियंता एस.व्ही. सोनटक्के मंत्रालयात उपसचिव म्हणून परत जाणार असल्याची चर्चा बांधकाम खात्यात आहे. मिथिलेश चव्हाण यांना बढती मिळाल्यास मालवत यांचा अकोल्यातील मार्ग सूकर होऊ शकतो. (जिल्हा प्रतिनिधी) जिल्हा परिषदेतही होणार बदल जिल्हा परिषद बांधकाम विभाग क्र. १ व २ च्या कार्यकारी अभियंत्यांची सेवानिवृत्ती तोंडावर आहे. त्यामुळे या दोनही जागा रिक्त होणार आहे. त्यातील बांधकाम विभाग क्र. १ च्या कार्यकारी अभियंता पदावर मनोहर सहारे लक्ष ठेऊन आहे. बढती मिळाल्यास सहारेंचा बांधकाम १ मध्ये नियुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न राहू शकतो. बढतीच्या प्रतीक्षेतील अन्य काही अभियंतेसुद्धा आपल्या सोईच्या नियुक्तीसाठी आतापासूनच मोर्चेबांधणी करीत आहे. त्यासाठी काहींनी राजकीय गॉडफादरचा आडोसा घेतला आहे.