लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस : शहरातील छोट्या कंत्राटदारांनी सीओंच्या निर्णयाविरुद्ध एल्गार पुकारून पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे.मुख्याधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या दहा कोटींची कामे छोट्या कंत्राटदारांना डावलून एकाच कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी एकत्रित निविदा प्रकाशित करण्यात आली. यामुळे छोट्या कंत्राटदारांच्या कामावर पाणी फेरले गेले. कुणालाही विश्वासात न घेता सीओंनी ही विविध कामे एकत्रित करून एकाच कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आमच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करून कंत्राटदार संघटनेने पालिकेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.मुख्याधिकारी शेषराव टाले यांच्या निर्णयाविरुद्ध एल्गार पुकारून कंत्राटदारांनी यापूर्वीच उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर गुरुवारपासून छोट्या कंत्राटदारांनी उपोषण सुरू केले. उपोषण मंडपाला विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला.एकालाच काम देण्याचा निर्णय योग्य- सीओ टालेमुख्याधिकारी शेषराव टाले यांनी अत्याधुनिक मशनरी असलेल्या कंत्राटदाराला काम देण्याचा निर्णय योग्य असल्याचे सांगितले. पुढील महिन्यात पाच कोटींची कामे मंजूर करण्यात येणार असून त्यात छोट्या कंत्राटदारांना सामावून घेतले जाणार आहे. त्यामुळे या कंत्राटदारांनी उपोषण मागे घेण्याची विनंती सीओ टाले यांनी केली आहे.
दिग्रसमध्ये कंत्राटदारांचे उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 10:14 PM
शहरातील छोट्या कंत्राटदारांनी सीओंच्या निर्णयाविरुद्ध एल्गार पुकारून पालिकेसमोर उपोषण सुरू केले आहे. मुख्याधिकाऱ्यांनी विविध योजनांच्या दहा कोटींची कामे छोट्या कंत्राटदारांना डावलून एकाच कंत्राटदाराला देण्याचा निर्णय घेतला.
ठळक मुद्देनिर्णयाचा निषेध : नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध एल्गार