लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यास कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने विरोध दर्शविला आहे. आधीच शिक्षकांचे शिक्षण सेवक पद निर्माण करून अन्याय करण्यात आला आहे. आता शिक्षण सेवकही कंत्राटीतत्वावर भरले जाणार आहे. तसे झाल्यास अंशकालीन पदवीधरांवर वेठबिगारीची परिस्थिती निर्माण होईल, असे महासंघाने म्हटले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले.जिल्ह्यात जवळपास मागील दहा वर्षांपासून शिक्षक भरती झालेली नाही. मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी यांना या पदाची पदोन्नती झाली नाही. याचा परिणाम गुणवत्तेवर झाला. आता शासन कंत्राटीतत्वावर शिक्षण सेवक नियुक्त करत असल्याने डी.एड, बेरोजगारांमध्ये प्रचंड रोष आहे.गेली दहा वर्षांपासून राबविलेल्या जात असलेल्या बदली प्रक्रियेमुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात मोठा रोष आहे. १० मार्च २००० च्या शासन निर्णयानुसार आणि संच मान्यतेनुसार शिक्षण सेवकांची भरती प्रक्रिया राबवावी, असे निवेदनात नमूद केले आहे. जिल्हाधिकाºयाना कास्ट्राईब कर्मचारी महासंघातर्फे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ भवरे, किरण मानकर, नामदेव थूल, सरचिटणीस मनोज भगत यांच्या नेतृत्वात निवेदन देण्यात आले. यावेळी बी.एन. मेश्राम, राजकुमार उमरे, देवीचंद मेश्राम, योगेश करपे, किशोर डाफे, हेमंत शिंदे, अतुल इरपाते, आनंद कांबळे, राहुल कुमरे, अनिल मनवर, सुहास परेकर आशा आडे, अनिल डोंगरे, व्ही.पी. खरतडे, प्रवीण गोबरे, राज गजभिये, सतीष कांबळे आदी उपस्थित होते.
शिक्षणसेवकांच्या कंत्राटीकरणाला विरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2019 10:34 PM
पदवीधर अंशकालीन उमेदवारांना विशेष बाब म्हणून कंत्राटी तत्वावर शिक्षण सेवक म्हणून सामावून घेण्यास कास्ट्राईब कर्मचारी महासंघाने विरोध दर्शविला आहे. आधीच शिक्षकांचे शिक्षण सेवक पद निर्माण करून अन्याय करण्यात आला आहे.
ठळक मुद्देकास्ट्राईबचे निवेदन : मुख्याध्यापक, केंद्र प्रमुखांना पदोन्नती नाही