शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

प्ले स्कूल, अंगणवाड्यांवर शिक्षण विभागाचे नियंत्रण; नवं धोरण लागू होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 9:46 AM

अभ्यासक्रम लागू होणार; तयारीला वेग

यवतमाळ : प्ले स्कूल, तसेच अंगणवाड्यांच्या अभ्यासक्रमांबाबत सध्या राज्य सरकारचे ठराविक नियम नाहीत. मात्र, आता त्यांच्यासाठी शिक्षण विभागामार्फत लवकरच नवा अभ्यासक्रम निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे प्ले स्कूल व अंगणवाडी चालविणाऱ्या संस्थांवर शिक्षण विभागाचे थेट नियंत्रण राहू शकणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार पूर्वप्राथमिक शिक्षणाला अतिशय महत्त्व देण्यात आले आहे. त्यानुसार सरकार अभ्यासक्रमाचा नवा आराखडा तयार करीत आहे. हा अभ्यासक्रम अमलात आल्यानंतर प्ले स्कूल चालविणाऱ्या संस्थांना सरकारकडे नोंदणी करणे बंधनकारक होणार आहे. 

खासगी व सरकारी अंगणवाड्याही या नियमांच्या अखत्यारीत येणार आहेत. शालेय शिक्षण सुरू होण्यापूर्वी मुलांचा पाया मजबूत व्हावा, या उद्देशाने सरकार पूर्वप्राथमिक शिक्षणाचा अभ्यासक्रम ठरवीत आहे. सध्या अंगणवाड्या व प्ले स्कूलमध्ये नेमके काय शिकविले जाते, याबाबत सरकारकडे माहितीच उपलब्ध नसल्याने त्याचा परिणाम शालेय शिक्षणावर होत आहे. त्यामुळे अंगणवाडीतील मुलांच्या शारीरिक विकासासोबतच बौद्धिक विकासावरही भर दिला जाणार आहे. शालेय शिक्षणाच्या नव्या अभ्यासक्रमात कृषी क्षेत्रालाही स्थान दिले जाणार आहे.   

टॅग्स :YavatmalयवतमाळSchoolशाळा