यवतमाळ : जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. २४ तासात २३ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. विविध ठिकाणच्या चाचण्यांमध्ये ९५३ रुग्ण आढळले आहे. आतापर्यंतची सर्वाधिक मृत्यूसंख्या आहे. वर्षभरात एका दिवसात इतके मृत्यू कधीच झाले नव्हते. तर ९५३ रुग्णांची नोंदही ही सर्वोच्च आहे.
जिल्ह्यातील कोरोना मृतांची एकूण संख्या ७८२ वर पोहोचली आहे. तर एकूण रुग्णांची संख्या ३५ हजार ५९१ इतकी झाली आहे. कोरोना संसर्गाचा दर हा ११.१२ वर पोहोचला आहे. मृत्यूचे प्रमाण २.२० आहे. २४ तासात चार हजार २२३ नमुने तपासण्यात आले. यापैकी तीन हजार २७९ नमुने निगेटिव्ह तर ९५३ नमुने पॉझिटिव्ह आले आहे. जिल्ह्यातील ॲक्टीव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या तीन हजार ७८६ झाली आहे. शासकीय व खासगी कोविड रुग्णालयात दोन हजार ५१ रुग्ण दाखल आहे. तर एक हजार ७३५ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत. पहिल्यांदाच गृहविलगीकरणातील रुग्णांपेक्षा रुग्णालयात दाखल रुग्णांची संख्या वाढली आहे.