शहरं
Join us  
Trending Stories
1
कागलमध्ये राडा! मुश्रीफ आणि घाटगे समर्थक भिडले; एकमेकांची कॉलर पकडून हाणामारी
2
मनसेकडून पाच नावांची घोषणा, चौथ्या यादीत कोणत्या मतदारसंघात उतरवले उमेदवार?
3
महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...
4
भायखळ्यात यामिनी जाधवांविरोधात ठाकरेंचा शिलेदार ठरला; कोण आहेत मनोज जामसुतकर?
5
"आम्हाला ५ जागा द्या, अन्यथा २५ जागांवर लढणार’’, मित्रपक्षाचा मविआला इशारा 
6
मृत्यू केव्हा गाठणार? एका रिपोर्टवर AI टूल करते भविष्यवाणी; लोकांच्या हॉस्पिटलमध्ये लागल्यात रांगा
7
जबरदस्त! Whatsapp मध्ये येणार कमाल फीचर; मोबाईल न वापरता मॅनेज करू शकता कॉन्टॅक्ट्स
8
Maharashtra Assembly Election: दिंडोशीत सुनील प्रभूंविरोधात शिंदेंच्या शिवसेनेचा उमेदवार कोण?
9
हॉकीच्या 'राणी'ला निरोप! "देशातील प्रत्येक मुलीचा आत्मविश्वास वाढवला", IAS अधिकारी भारावली
10
Maharashtra Assembly election 2024: अंधेरी पूर्वची जागा शिंदेंच्या शिवसेनेला की, भाजपला?
11
"वर्षभर वेळ मागितला, तरी दिला नाही; मातोश्रीवर गेलो तिथे ६ तास थांबवलं अन् २ मिनिटे भेटले"
12
अभिनेता पृथ्वीक प्रतापने साधेपणाने लग्न का केलं? कारण वाचून तुम्हीलाही वाटेल हेवा!
13
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास सुरुवात; येत्या तीन दिवसांत टेंट, शेड अन् इमारती हटवल्या जाणार
14
पतीसह पिकनिकला गेलेल्या महिलेवर सामूहिक बलात्कार, व्हिडीओही बनवले, गुन्हा नोंदवण्यासाठी पीडितांची वणवण
15
Baba Siddiqui : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणातील शूटरला देश सोडण्यासाठी पासपोर्ट देण्याचं दिलेलं आश्वासन
16
आदित्य ठाकरेंकडे ५३५ हिरे लगडलेले कडे, दीड किलो सोने...; प्रतिज्ञापत्रात उद्धव ठाकरेंचेही उत्पन्न केले जाहीर
17
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा स्ट्राइकरेट कसा असेल? मुख्यमंत्री शिंदे यांनी एका वाक्यात सांगितलं 
18
Maharashtra Assembly Election 2024: दिनकर पाटलांमुळे भाजपला फटका? नाशिकमध्ये समीकरण बदललं!
19
"राहुल गांधींच्या विधानाची मोडतोड करून फेक नरेटिव्ह पसरवण्याचा भाजपाचा प्रयत्न’’, नाना पटोले यांचा आरोप

कोरोनाने सलग तिसऱ्या दिवशी घेतला दोन तरुणांसह १५ नागरिकांचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 5:00 AM

विशेष म्हणजे रविवारी आणि सोमवारीही कोरोनाने प्रत्येकी १५ बळी घेतले. मंगळवारी दगावलेल्या १५ जणांमध्ये ३४ व ४२ वर्षीय दोन तरुणांसह १३ वृद्धांचा समावेश आहे. त्यापैकी मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील ८४, ६५ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ५० वर्षीय महिला, तालुक्यातील ५७, ९० वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ६२ वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

ठळक मुद्देसंसर्ग मात्र थंडावला : ७२७ पाॅझिटिव्ह तर ८२४ जणांची कोरोनावर मात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून कोरोना संसर्गाचा वेग मंदावला. त्यामुळे दरदिवशी आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा सतत हजाराच्या खाली येत आहे. मंगळवारीही दिवसभरात ७२७ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले. तर तब्बल ८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले. मात्र मंगळवारी आणखी १५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यूही झाला. विशेष म्हणजे रविवारी आणि सोमवारीही कोरोनाने प्रत्येकी १५ बळी घेतले. मंगळवारी दगावलेल्या १५ जणांमध्ये ३४ व ४२ वर्षीय दोन तरुणांसह १३ वृद्धांचा समावेश आहे. त्यापैकी मेडिकलमध्ये मृत्यू झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील ८४, ६५ वर्षीय पुरुष, तालुक्यातील ७५ वर्षीय पुरुष, दारव्हा येथील ५० वर्षीय महिला, तालुक्यातील ५७, ९० वर्षीय पुरुष, घाटंजी तालुक्यातील ७० वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ६२ वर्षीय पुरुष आणि पांढरकवडा येथील ५४ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये पुसद येथील ६७ वर्षीय पुरुष तर खासगी रुग्णालयात यवतमाळ येथील ३४, ७८ वर्षीय पुरुष, पुसद येथील ६३ वर्षीय पुरुष, दिग्रस येथील ६५ वर्षीय महिला आणि चंद्रपूर येथील ४२ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. पाॅझिटिव्ह आलेल्या ७२७ जणामध्ये ४५८ पुरुष आणि २६९ महिला आहे. त्यात यवतमाळ १५५, वणी ८४, दिग्रस ८३, दारव्हा ८१, पुसद ७०, झरी जामणी ५४, पांढरकवडा ३१, बाभूळगाव २९, राळेगाव २५, नेर २४, मारेगाव २३, महागाव २१, घाटंजी २०, उमरखेड १९, कळंब ११, आर्णी ६ आणि अन्य शहरातील ११ रुग्णांचा समावेश आहे. सुरुवातीपासून आतापर्यंत पाच लाख ४४ हजार ८४६ नमुने तपासण्यात आले. यापैकी पाच लाख ४२ हजार ९७७ अहवाल आले असून १८३९ अप्राप्त आहे. 

६८५१ जणांचे अहवाल निगेटिव्ह - मंगळवारी ७५१८ अहवालांपैकी ६८५१ निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत ४३३६ ॲक्टिव्ह पाॅझिटिव्ह आहेत. त्यापैकी २०७१ रुग्णालयात तर २२६५ गृहविलगीकरणात आहे. आतापर्यंत एकूण पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या ६८ हजार ९४८ तर कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या ६२ हजार ९६२ आहे. दरम्यान १६५० जणांचा मृत्यू झाला. जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट १२.६६ इतका असून कोरोनाचा मृत्यूदर २.४९ इतका आहे.  

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू