लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात शुक्रवारी कोरोनाने आणखी एक बळी घेतला. घाटंजी शहरातील ६५ वर्षीय महिला कोरोनाने दगावल्याची माहिती प्रशासनाने दिली. तर दिवसभरात जिल्ह्यात ५२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शुक्रवारी एकूण ७११ अहवाल प्राप्त झाले. यापैकी ५२ जण नव्याने पॉझेटिव्ह तर ६५९ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत ४६९ ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या ११ हजार ३८२ झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात २८ जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या १० हजार ५४३ झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३७० मृत्यूची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत १ लाख १० हजार १४९ नमुने पाठविले असून यापैकी १ लाख ९ हजार ३३३ प्राप्त तर ८१६ अप्राप्त आहेत. तसेच ९७ हजार ९५१ नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जिल्हा परिषद आरोग्य विभागाने कळविले आहे. जिल्ह्यात सलग आठवडाभरापासून कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टन्स पाळत मास्कचा काटेकोर वापर करणे आवश्यक झाले आहे. गर्दीच्या ठिकाणी अंतर राखण्याचे आवाहन केले जात आहे.
घाटंजीला दुसरा धक्का मार्च ते जुलैपर्यंत एकही रुग्ण न आढळलेल्या घाटंजी शहरात नंतर अनेक पाॅझिटीव्ह आढळले. दोन दिवसापूर्वीच घाटंजी शहरातील ६० वर्षीय इसमाचा कोरोनाने मृत्यू झाला. सर्व परिचित असलेल्या या व्यक्तीच्या मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळत असतानाच लगेच शुक्रवारी शहरातील आणखी एका ६५ वर्षीय महिलेचा कोरोनाने बळी घेतला. कोरोनाने शहरात सलग दोन मृत्यूची बातमी कळताच नागरिकांमध्ये शोक आहे.