शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
2
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
3
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
4
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
5
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
6
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
7
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
8
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
9
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
10
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
11
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
18
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
19
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

कोरोना कोपला, पुन्हा 34 जणांना झाली लागण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2022 5:00 AM

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त माहितीनुसार गुरुवारी ८८३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८४९ अहवाल निगेटिव्ह आले तर ३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दिवसभरात दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. यातील दहा जण जिल्ह्याबाहेरील रहिवासी आहेत. आतापर्यंत एकंदर ७३ हजार ५७ नागरिकांना जिल्ह्यात कोरोनाची लागण झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मध्यंतरी ओसरलेला कोरोना पुन्हा कोपला आहे. गेल्या चार दिवसांपासून रुग्णसंख्या वाढत असताना गुरुवारी एकाच दिवसात तब्बल ३४ नवे रुग्ण आढळल्याने प्रशासन हादरले आहे. त्यामुळे निर्बंध वाढविण्याच्या हालचालीही सुरू झाल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त माहितीनुसार गुरुवारी ८८३ जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील ८४९ अहवाल निगेटिव्ह आले तर ३४ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. दिवसभरात दोन रुग्ण कोरोनामुक्त झाले. त्यामुळे सध्या जिल्ह्यातील ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ७७ झाली आहे. यातील दहा जण जिल्ह्याबाहेरील रहिवासी आहेत. आतापर्यंत एकंदर ७३ हजार ५७ नागरिकांना जिल्ह्यात कोरोनाची लागण झाली. त्यातील ७१ हजार १९२ नागरिक कोरोनामुक्त झाले. तर १७८८ जणांचा मृत्यू नोंदविला गेला. गेल्या दीड वर्षात कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाने चाचण्यांचा वेगही वाढविला. आतापर्यंत एकंदर सात लाख ८९ हजार ८४८ कोरोना चाचण्या करण्यात आल्या. त्यापैकी सात लाख १६ हजार ७२४ अहवाल निगेटिव्ह आहेत. सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ९.२५ असून दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर गुरुवारी ३.८५ होता. तर जिल्ह्याचा कोरोना मृत्यू दर २.४५ इतका आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेर फिरताना काळजी घेण्याची गरज आहे. 

कुठे किती रुग्ण आढळले - गुरुवारी आढळलेल्या ३४ कोरोना रुग्णांपैकी १६ महिला तर १८ पुरुष आहेत. आर्णी, बाभूळगाव, उमरखेड, नेर, झरीजामणी या पाच ठिकाणी प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला. पांढरकवडा येथे तीन, राळेगाव येथे दोन तर वणी येथे तीन रुग्ण आढळून आले. यवतमाळ येेथे मात्र एकाच दिवसात तब्बल १६ रुग्णांची नोंद झाली. तर गुरुवारी आढळलेल्या ३४ रुग्णांपैकी पाच रुग्ण अन्य जिल्ह्यातील मूळ रहिवासी आहेत.

दर दिवसाला चार हजार कॉन्टॅक्ट ट्रेसिंग- जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे शासकीय यंत्रणाही ॲक्शन मोडवर आली आहे. सर्वत्र  खबरदारीच्या सूचना दिल्या आहेत. दर दिवसाला चार हजार नागरिकांच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे उद्दिष्ट यंत्रणेने डोळ्यांपुढे ठेवलेे आहे. एका पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील ४० नागरिकांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग होणार आहे.

समारंभांमध्ये परजिल्ह्यातील लोकांची हजेरी घातक - निर्बंध असले तरी जिल्ह्यात अजूनही लग्नसमारंभ धडाक्यात पार पडत आहे. या समारंभाच्या निमित्ताने परजिल्ह्यातील पाहुणे मंडळीही हजेरी लावत आहे. त्यातून कोरोनाचा संसर्ग फैलावण्याचा धोका वाढला आहे. गेल्या चार दिवसांपासून वाढलेल्या रुग्णांपैकी तब्बल १५ जण अन्य जिल्ह्यातील मूळ रहिवासी असल्याचे पुढे आले आहे. ही मंडळी समारंभाच्या निमित्ताने जिल्ह्यात येवून बाधित झाली की त्यांना आधीच संसर्ग झाला व यवतमाळात तपासणी झाली याचाही विचार होणे गरजेचे आहे. 

शाळेवर विशेष लक्ष केंद्रीत करा- रूग्णसंख्या वाढत असल्याने शाळेत कोरोना नियमाचे पालन करण्याच्या सूचना आहेत. या नियमाचे पालन होत नसेल तर थेट शाळांवर कारवाई होणार आहे. त्या दृष्टीने कामकाज करण्यासाठी शिक्षणाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. 

रूग्णसंख्या वाढत असल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आहे. नियमांचे पालन होत नसल्यास थेट कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.- अमोल येडगे, जिल्हाधिकारी, यवतमाळ

शाळांसाठी बंदी नाही, पण निर्बंध कठोर - अन्य जिल्ह्यांमध्ये कोरोनामुळे शाळा पुन्हा बंद झालेल्या असल्यातरी यवतमाळ जिल्ह्यातील शाळा बंद करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचा अद्याप कुठलाही आदेश नाही. मात्र गुरुवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शाळांसाठी कठोर नियमावली जाहीर केली. - त्यानुसार शाळेमध्ये कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यावर सध्या बंदी आली आहे. शाळा दोन सत्रात भरवावी लागणार आहे. एका बाकावर एकच विद्यार्थी, दोन बाकांमध्ये सुरक्षित अंतर, शाळा व परिसर सॅनिटाईज करणे, वर्गखोल्यांची दारे, खिडक्या सतत उघड्या ठेवणे, स्वच्छतागृहात एकाच वेळी गर्दी न करणे, विद्यार्थ्यांनी एकमेकांच्या मास्कची अदलाबदली न करणे, त्यावर शिक्षकांनी लक्ष ठेवणे, शाळेत मुबलक पाणी, साबण उपलब्ध ठेवणे आदी सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी जारी केल्या आहेत. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या