शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

कोरोनाचा मृत्यूदर सरासरीहून जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2020 5:00 AM

कोरोना हा पैसे लागणारा आजार आहे. खाजगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल काढले जाते. त्यामुळे रुग्णांची लूट थांबवा. कोरोनाबाधितांवर शासनाकडून मोफत औषधी, उपचार आहे. हा संदेश नागरिकांत गेला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून जनजागृती करा, असे ना. पटोले यांनी सांगितले. जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभारायच्या असेल तर शासनाच्या निधीची वाट न बघता कंपन्यांचा सीएसआर फंड उपयोगात आणा.

ठळक मुद्देविधानसभा अध्यक्ष : नागरिकांच्या मनातील भीती दूर करण्याचे प्रशासनाला निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचे संकट सुरू झाल्यापासून पहिल्या अडीच महिन्यात एकही मृत्यू न झालेल्या यवतमाळचा मृत्युदर आज ३.१ टक्के आहे, याबाबत विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी खंत व्यक्त केली. कोरोनचा मृत्यूदर हा सरासरी २.८ टक्के आहे. त्यापेक्षा मृत्युदर जास्त असणे हे आपले अपयश आहे. हा दर कमी करण्यासाठी लोकांच्या मनातून कोरानाबाबतची भीती घालविण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश ना. पटोले यांनी रविवारी घेतलेल्या आढावा बैठकीत दिले.कोरोना हा पैसे लागणारा आजार आहे. खाजगी रुग्णालयात अव्वाच्या सव्वा बिल काढले जाते. त्यामुळे रुग्णांची लूट थांबवा. कोरोनाबाधितांवर शासनाकडून मोफत औषधी, उपचार आहे. हा संदेश नागरिकांत गेला पाहिजे. यासाठी सर्व स्तरातून जनजागृती करा, असे ना. पटोले यांनी सांगितले. जिल्ह्यात आरोग्य सुविधा उभारायच्या असेल तर शासनाच्या निधीची वाट न बघता कंपन्यांचा सीएसआर फंड उपयोगात आणा. खनीजमधून असा फंड उभारण्यास यवतमाळ जिल्ह्यात अडचण यायला नको, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान विधानसभा अध्यक्षांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये असलेल्या कोरोना रूग्णालयाची पाहणी केली.जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्याच्या कोविडचा आढावा घेतला. सादरीकरण जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी केले. बैठकीला माजी आमदार कीर्ती गांधी, वामनराव कासावार, विजय खडसे, किसान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, श्याम पांडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ पाटील, शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वºहाडे, डॉ. गिरीश जतकर, डॉ. सुरेंद्र भुयार, डॉ. विजय डोंबळे, डॉ. मनवर, किरण कुमरे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.नाना पटोले यांचे स्वानुभवाचे बोलकोरोना ही बिमारी फुफ्फुसाशी निगडीत आहे. फुफ्फुसाला दुसरा पर्याय नाही. तीन ते चार दिवस ही बिमारी अंगावर काढली तर आपले काहीही होऊ शकते. या सर्व प्रक्रियेमधून मी गेलो आहे. त्यामुळे नागरिकांनी लक्षणे दिसताच आपली चाचणी करून घ्यावी. जिल्ह्यात चाचण्या करण्याची प्रक्रिया वाढवा. ऑक्सीजनवरचा रुग्ण आपल्या हातात आहे. व्हेंटीलेटरवर त्याला जाऊ देऊ नका. तसेच रुग्णालयाची गर्दी कमी करायची असेल तर रुग्ण घरीच बरा झाला पाहिजे, याबाबत प्रशासनाने निश्चित धोरण आखावे, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याNana Patoleनाना पटोले