शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी सत्तेसाठी खालच्या थराला जात आहेत; देशमुखांवरील हल्ल्यानंतर शरद पवारांचा संताप
2
भाजपावर हल्लाबोल, मनसेची काढली लायकी; अबु आझमींचं कौतुक, संजय राऊत सभेत कडाडले
3
मजबूत जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात तेजी; IT, बँकिंग शेअर्समध्ये मोठी खरेदी
4
ब्राझीलमध्ये नरेंद्र मोदी आणि जॉर्जिया मेलोनी यांच्यात बैठक, 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा!
5
महाराष्ट्राचं सरकार हे दिल्लीतून चालतंय, सुप्रिया सुळेंचा आरोप 
6
'राहुलजी! आम्ही आणलेली गुंतवणूक बघा'; देवेंद्र फडणवीस यांनी दिले आव्हान
7
Maharashtra Election 2024 Live Updates: राज्यात प्रचारतोफा थंडावल्या, आता मतांची तोफ मतदारांच्या हाती!
8
खोटे आरोप करून सहानुभूती मिळवायचा प्रयत्न : अजित पवार 
9
स्वेच्छानिवृत्ती किंवा बदली; तिरुपती बालाजी मंदिरातील गैर-हिंदू कर्मचाऱ्यांना स्पष्ट निर्देश
10
कोणत्या पवारांची जादू चालणार? भाजप-शिंदेसेनेला बळ मिळेल का? मविआ- महायुती यांच्यात जोरदार लढत!
11
महागड्या कर्जामुळे जनता त्रस्त, बँकांनी व्याजदर कमी करण्याची गरज : निर्मला सीतारामन
12
राहुल गांधींनी कोर्टात हजर राहावे; वीर सावरकर बदनामी प्रकरणी पुणे कोर्टाचे आदेश
13
नवीन कथेसह दाखल झाला 'कांतारा २'चा टीझर, शिव रुपात दिसला ऋषभ शेट्टी
14
आपल्या पैशांची FD करायचा विचार करताय? वापरा 'ही' युक्ती, मिळेल जास्त नफा
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
16
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
17
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
18
लॉरेन्स बिष्णोईचा भाऊ अनमोल बिष्णोईला अमेरिकेत अटक
19
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
20
मविआचे सरकार आल्यास २,८०,००० रोजगार देणार; मल्लिकार्जुन खरगे यांचे आश्वासन

यवतमाळ जिल्ह्याचा रिकव्हरी रेट 90 टक्क्यांच्या वर, आतापर्यंत 60 हजारांपेक्षा जास्त जण कोरोनामुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2021 7:21 PM

गत पंधरवाड्यात 83 टक्क्क्यांच्या आसपास असलेला जिल्ह्याचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) आता 90 टक्क्यांच्या वर गेला आहे.

गत पंधरवाड्यात 83 टक्क्क्यांच्या आसपास असलेला जिल्ह्याचा रिकव्हरी रेट (बरे होण्याचे प्रमाण) आता 90 टक्क्यांच्या वर गेला आहे. चालू आठवड्यात सतत सहाव्या दिवशीसुध्दा कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या जास्त आहे. जिल्ह्यासाठी हे नक्कीच दिलासादायक चित्र असून जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सामुहिक प्रयत्नांचे हे फलित आहे.सुरवातीपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 60496 जणांनी कोरोनावर मात केली असून बरे होण्याचे प्रमाण 90.28 टक्के आहे. गत 24 तासात जिल्ह्यात कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणा-यांची संख्या 464 ने जास्त आहे. जिल्ह्यात 529 जण पॉझेटिव्ह तर 993 जण कोरोनामुक्त झाले असून 20 जणांचा मृत्यु झाला. दोन मृत्यु जिल्ह्याबाहेरील (नांदेड आणि वाशिम) आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 12 मृत्यु, डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये दोन तर खाजगी रुग्णालयातील सहा मृत्यु आहे.जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 6416 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 529 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5887 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 4903 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2280 तर गृह विलगीकरणात 2623 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 67004 झाली आहे. 24 तासात 993 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 60496 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1605 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 12.80 , मृत्युदर 2.40 आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृत्यु झालेल्यांमध्ये यवतमाळ येथील 60 वर्षीय महिला, तालुक्यातील 68 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 55 वर्षीय पुरुष व 45 वर्षीय महिला, आर्णि तालुक्यातील 54 वर्षीय पुरुष, आर्णि येथील 65 वर्षीय महिला, घाटंजी येथील 60 वर्षीय पुरुष, पांढरकवडा येथील 65 वर्षीय महिला, तालुक्यातील 59 वर्षीय पुरुष, वणी येथील 27 वर्षीय महिला, बाभुळगाव तालुक्यातील 48 वर्षीय महिला आणि दारव्हा तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष आहे. डीसीएचसीमध्ये मृत्यु झालेल्यांमध्ये वाशिम येथील 60 वर्षीय महिला आणि दारव्हा येथील 69 वर्षीय महिला आहे. तर खाजगी रुग्णालयात यवतमाळ येथील 23 वर्षीय महिला, दिग्रस येथील 60 वर्षीय महिला, वणी येथील 70 वर्षीय पुरुष व 71 वर्षीय महिला, पुसद येथील 47 वर्षीय पुरुष आणि किनवट (जि. नांदेड) येथील 73 वर्षीय पुरुषाचा मृत्यु झाला.            शनिवारी पॉझेटिव्ह आलेल्या 529 जणांमध्ये 324 पुरुष आणि 205 महिला आहेत. यात पांढरकवडा येथील 83 पॉझेटिव्ह रुग्ण, बाभुळगाव 57, यवतमाळ 52, आर्णि 51, दारव्हा 45, घाटंजी 38, पुसद 31, राळेगाव 31, झरीजामणी 31, कळंब 27, वणी 26, दिग्रस 22, महागाव 19, उमरखेड 10, नेर 4, मारेगाव 1  आणि इतर शहरातील 1 रुग्ण आहे.सुरवातीपासून आतापर्यंत 523559 नमुने पाठविले असून यापैकी 521209 प्राप्त तर 2350 अप्राप्त आहेत. तसेच 454205 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 989 बेड उपलब्ध :जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, दहा डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 30 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण 989 बेड उपलब्ध आहेत. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 400 बेड रुग्णांसाठी उपयोगात, 177 बेड शिल्लक, दहा डीसीएचसीमध्ये एकूण 516 बेडपैकी 167 रुग्णांसाठी उपयोगात, 349 बेड शिल्लक आणि 30 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1099 बेडपैकी 636 उपयोगात तर 463 बेड शिल्लक आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याYavatmalयवतमाळ