शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
2
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंची जाहीरच करून टाकलं
3
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
4
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
5
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
6
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
7
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
8
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
9
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
10
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
11
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
12
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
13
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”
14
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
15
Gautam Adani News : अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
16
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
17
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
18
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
19
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
20
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही

CoronaVirus : यवतमाळातील १२ जणांचा दिल्लीच्या निजामुद्दीन संमेलनात सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2020 3:52 PM

coronavirus : दिल्ली येथे अलिकडेच निजामुद्दीन संमेलन भरले होते. देश-विदेशातून नागरिक तेथे सहभागी झाले.

यवतमाळ : कोरोना संशयितांबाबत प्रशासनाकडून खास खबरदारी घेतली जात असतानाच जिल्ह्यातील १२ जण दिल्ली येथे पार पडलेल्या निजामुद्दीन संमेलनात सहभागी झाले होते, अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे कोरोना संशयित म्हणून हे १२ जण आरोग्य प्रशासनाच्या रडारवर आले आहे. 

दिल्ली येथे अलिकडेच निजामुद्दीन संमेलन भरले होते. देश-विदेशातून नागरिक तेथे सहभागी झाले. मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने तेथून कोरोनाचा फैलाव झाल्याचा संशय आहे. यामुळे या संमेलनात नेमके किती आणि कुठले लोक सहभागी झाले याचा शोध सर्व राज्यांनी घेतला. त्यातूनच यवतमाळ जिल्ह्यातील १२ लोक संमेलनाला गेले होते, अशी माहिती व त्यांच्या नावांची यादी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाली.

प्रशासनाने लगेच या १२ व्यक्तींची शोधाशोध चालविली. त्यातील पाच जण परत आल्याचे आढळून आले. त्यांना आता वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठविले गेले आहे. अद्याप त्यांचे अहवाल प्राप्त झालेले नाही. अहवालानंतरच हे पाच जण पॉझिटीव्ह की निगेटीव्ह हे स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच उपचाराची पुढील दिशा निश्चित होईल. 

‘ते’ सात जण दिल्लीत थांबल्याची शक्यतादरम्यान संमेलनाला गेलेले उर्वरित सात जण जिल्ह्यात अद्याप परतले नसल्याची खात्री प्रशासनाने केली आहे. त्या सात जणांचा शोध सुरू आहे. ते एक तर दिल्लीत थांबले असावे, प्रवासादरम्यान अन्य राज्यात किंवा महाराष्टÑातील एखाद्या जिल्ह्यात अडकले असावे, अशी शक्यता वर्तविली जात आहे. प्रशासनाकडून त्यांची माहिती घेतली जात आहे.

टॅग्स :Yavatmalयवतमाळ