शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

CoronaVirus : कोरोनाच्या संकटातही कमिशनखोरीची लागण, ‘बायोडायव्हर्सिटी’ची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 05, 2020 3:08 PM

यवतमाळ : कोरोनाच्या संकटात कामे बंद असली तरी कर्मचारी कपात न करता त्यांना पूर्ण पगार देण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र ...

यवतमाळ : कोरोनाच्या संकटात कामे बंद असली तरी कर्मचारी कपात न करता त्यांना पूर्ण पगार देण्याचे शासनाचे निर्देश आहे. मात्र याच कोरोना संकटाचा आडोसा घेत नागपुरातील जैवविविधता मंडळाने कर्मचारी कपात केली. आता याच कर्मचा-यांना पुनर्नियुक्तीसाठी कमिशन मागितले जात आहे. अन्यायग्रस्त कर्मचा-यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागितल्यानंतर या प्रकरणाचा भंडाफोड झाला. 

महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळाचे (बायोडायव्हर्सिटी) राज्याचे मुख्यालय नागपुरात आहे. २०१२ साली या मंडळाची स्थापना झाल्यापासून कार्यरत असलेल्या कर्मचा-यांवर आता प्रशासनाने बेरोजगारीची कु-हाड उगारली आहे. येथे औषधी तज्ज्ञ विवेक येन्नरवार, लिपिक स्वप्नील चौधरी, नीलेश बाळापुरे, नीलेश वाघमारे, लेखापाल रमेश पद्मगिरीवार, शिपाई संदीप पाटील, हेमंत नेवारे हे सुरुवातीपासून कंत्राटी तत्वावर कार्यरत आहे. हे कर्मचारी मनप्रित मॅनपॉवर कन्सल्टन्सीच्या माध्यमातून मंडळाला पुरविण्यात आले होते. नियमानुसार आजवर त्यांचे कंत्राट ‘रिन्यूव्ह’ होत आले. मात्र आताच ३१ मार्च रोजी कंत्राटाची मुदत संपताच त्यांना घरचा रस्ता दाखविण्यात आला.

मंडळाच्या कामासाठी मनुष्यबळ पुरवठ्याचे काम ई-निविदेद्वारे ब्लॅक बेल्ट सिक्युरिटी अ‍ॅन्ड मॅनपॉवर सर्व्हिसेस या संस्थेला देण्यात आले. आता या कर्मचा-यांना नोकरीत कायम रहायचे असल्यास या नव्या बाह्य संस्थेची मर्जी संपादन करणे आवश्यक झाले आहे. गंभीर म्हणजे नोकरी हवी असेल तर आठ ते नऊ टक्के कमिशन रोख स्वरुपात द्या, अशी मागणी संस्थेतर्फे केली जात आहे, अशी तक्रार अन्यायग्रस्त कर्मचा-यांनी केली आहे. 

या प्रकाराबाबत कर्मचा-यांनी जैवविविधता मंडळाचे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक जीत सिंग यांच्याकडे तक्रारही केली. मात्र या तक्रारीची दखल न घेता भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात आल्याचा आरोप कर्मचा-यांनी केला आहे. कुठेही दाद मिळत नसल्याने अन्यायग्रस्त कर्मचा-यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. ई-टेन्डरींगद्वारे मनुष्यबळ पुरवठ्यासाठी नवीन कंत्राटदाराला दिलेले कंत्राट रद्द करावे, आधीच्याच बाह्य यंत्रणेला मुदतवाढ देऊन आमच्या सेवा अखंड सुरू ठेवाव्या, मानधनात दहा टक्के वाढ करण्यात यावी आदी मागण्या मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आल्या आहे.

कोरोना परिस्थितीत कर्मचा-यांच्या वेतनात कपात करू नये, त्यांच्या सेवा खंडित करू नये असे आदेश मुख्य कामगार आयुक्तांनी दिलेले असतानाही जैवविविधता मंडळाने केलेली कर्मचारी कपात वादाचा विषय ठरला आहे. तांत्रिक अधिका-यांवर हजारोची उधळपट्टीसर्वसामान्य कर्मचा-यांना नियम दाखवून घरी पाठविले जात आहे. तर त्याच वेळी जैवविविधता मंडळाने तांत्रिक अधिका-यांवर नियम डावलून हजारोंची उधळपट्टी सुरू केली आहे. निवृत्त विभागीय वन अधिका-यांना तांत्रिक अधिकारी या काल्पनिक पदावर नेमण्याचा सपाटा सुरू आहे. त्यासाठी कोणतीही जाहिरात न देता मर्जीतील अधिका-यांना नेमणूक देण्यात आली. या अधिका-यांवर महिन्याला ६० ते ७० हजार रुपये खर्च केले जात असल्याची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. केवळ मनमानी आणि हिटलरशाही पद्धतीने अधिकारी काम करीत आहे. बाह्यस्रोत संस्था कमिशन मागत असल्याबाबत सांगितल्यावरही सदस्य सचिवांनी जाणीवपूर्वक कानाडोळा केला. अनुभवी कर्मचा-यांना जाणीवपूर्वक अर्ध्या वेतनावर काम करायला लावण्याचा घाट घातला आहे. - विवेक येन्नरवारअन्यायग्रस्त कर्मचारी

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसYavatmalयवतमाळ