यवतमाळ - यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता 80 वर पोहचली आहे. तर आयसोलेशन वॉर्डमध्ये भरती असलेल्या 124 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र आरोग्याच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून त्यांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
गेल्या 24 तासांत दोन जण आयसोलेशन वॉर्डमध्ये नव्याने भरती झाले आहे. त्यामुळे भरती असलेल्या रुग्णांची संख्या 141 असून यापैकी 61 प्रिझमटिव्ह केसेस आहेत. तसेच 24 तासांत 14 रिपोर्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झाले. यापैकी 12 रिपोर्ट निगेटिव्ह आहेत. शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयाने तपासणीकरीता सात नमुने पाठविले आहे.
सुरुवातीपासून आतापर्यंत तपासणीकरीता पाठविलेल्या नमुन्यांची संख्या एकूण 1162 असून यापैकी 1155 रिपोर्ट प्राप्त तर सात रिपोर्ट अप्राप्त आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाला प्राप्त झालेले एकूण निगेटिव्ह रिपोर्ट 1064 आहे. सद्यस्थितीत संस्थात्मक विलगीकरणात 108 जण असून गृह विलगीकरणात एकूण 1081 जण आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
CoronaVirus News : देशात 75,000 व्हेंटिलेटर्सची आवश्यकता, कोरोनाग्रस्तांची संख्या 35,043 वर
लवकर उरकून घ्या आर्थिक व्यवहार, मे महिन्यात 12 दिवस बँक बंद राहणार
CoronaVirus News : धक्कादायक! कोरोना चाचणी करण्यास सांगितले, संतापलेल्या पतीने पत्नीचे केस कापले
CoronaVirus News : जगाला कोरोनाचा विळखा! जाणून घ्या, कोणत्या देशात किती कोरोनाग्रस्त?