यवतमाळ - संपूर्ण जगाला कोरोनाने विळखा घातला आहे. अनेकांना आपला जीव गमवावा लागत आहेत. कोणी आपले वडील गमावले, कोणी आई तर कोणी आपले संपूर्ण कुटुंब गमावले. पण या जगात असेही लोक आहेत की कोरोनासारख्या जीवघेण्या आजारावर मात करून आपल्या घरी परतत आहेत. अशाच एका ९३ वर्षाच्या आजीने या कोरोना व्हायरसवर मात केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पुसद शहरातील नवीन पुसद येथे राहणाऱ्या प्रभावती काळीकर या कोरोनावर मात करीत सुखरूप घरी पोहचल्या आहेत. याचे श्रेय ती घरातील सर्व सद्स्य व जिल्हा शासकीय रुग्णालय यवतमाळमधील सर्व स्टाफ व डॉक्टरांना दिलं आहे.
आजींनी योग्य प्रकारे काळजी घेतल्याचं म्हटलं आहे. तसेच कोरोनाला घाबरू नका व तसेच या काळात सर्वांनी आपल्या कुटुंबाची काळजी घ्या असं आजींनी म्हटलं आहे. कोरोनाचा कहर पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे, यात राज्याच्या कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात येणार आहे, या बैठकीत राज्यात अंशत: लॉकडाऊनबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. सरकारने काही दिवसांपूर्वी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले होते, परंतु अद्यापही अनेक ठिकाणी लोकांची गर्दी होताना दिसत आहे, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि सरकारी पातळीवर मोठ्या हालचाली वाढल्या आहेत, दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत असल्याने ठाकरे सरकारची चिंता वाढली आहे.
कोरोनाचा वाढता कहर! मुंबई लोकलची सेवा पुन्हा खंडीत होणार? मंत्री विजय वडेट्टीवार म्हणतात...
राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी मुंबईलोकलबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. मुंबई लोकलबाबतविजय वडेट्टीवार यांना प्रश्न विचारला असता त्यांनी उत्तर दिलं आहे. लॉकडाऊन सामान्य जनतेला परवडणार नाही. निर्बंध लागतील पण लॉकडाऊन नाही. मुंबई लोकल बंद होणार नाही असं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. गर्दी कशी कमी होईल यावर भर दिला जाईल. लॉकडाऊन जरी नसला तरी निर्बंध अधिक कडक केले जातील. लोकल प्रवाशांची विभागणी करण्यात येईल. लोकल बंद होणार नाही पण निर्बंध लागतील असं देखील म्हटलं आहे. गुरुवारी राज्यात ४३ हजार १८३ कोरोनाबाधित आढळले, तर २४९ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचसोबत सध्याच्या घडीला राज्यात ३ लाख ६६ हजार ५३३ सक्रीय रुग्ण आहे.
मुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे, मुंबईची लाइफलाइन समजली जाणारी लोकल फक्त अत्यावश्यक सेवेसाठी व शासकीय कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात अंशत: लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो. त्यानुसार ज्या शहरांमध्ये रुग्णसंख्या वाढली आहे, त्या ठिकाणी मॉल, सिनेमागृह, नाट्यगृह आणि खासगी आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. राज्यात संपूर्ण लॉकडाऊन केला जाण्याची शक्यता कमी आहे परंतु यातून मध्यममार्ग काय काढता येईल यासाठी मंत्रालयात अधिकाऱ्यांच्या, तर महाविकास आघाडीतील नेत्यांच्या ‘वर्षा’वर मुख्यमंत्र्यांसोबत बैठका सुरू आहेत.