लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यात गत 24 तासात कोरोनाबाधित रुग्णांपेक्षा बरे होणा-यांचा आकडा 195 ने जास्त आहे. जिल्ह्यात 815 जण पॉझेटिव्ह आले असून 1010 जण कोरोनामुक्त झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याबाहेरील दोन मृत्युसह जिल्ह्यात एकूण 23 मृत्युची नोंद झाली. यातील वैद्यकीय महाविद्यालयात 17, खाजगी कोव्हीड रुग्णालयात चार आणि डीसीएचसीमध्ये दोन मृत्यु झाले. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 6589 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 815 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 5774 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 7088 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 2689 तर गृह विलगीकरणात 4399 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 63652 झाली आहे. 24 तासात 1010 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 55047 आहे. तर जिल्ह्यात एकूण 1517 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 13.14, मृत्युदर 2.38 आहे.