पालिका कारभाराविरुद्ध नगरसेवकांचे आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2018 11:34 PM2018-08-29T23:34:50+5:302018-08-29T23:36:01+5:30

शहरात नगर परिषद अस्तित्वात आहे काय असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टाऊन हॉलसमोर ठिय्या आंदोलन केले. पालिकेची सर्वसाधारण सभा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती.

Corporators movement against municipal administration | पालिका कारभाराविरुद्ध नगरसेवकांचे आंदोलन

पालिका कारभाराविरुद्ध नगरसेवकांचे आंदोलन

googlenewsNext
ठळक मुद्देसभा गाजली : वाढीव क्षेत्रात समस्यांचा डोंगर

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : शहरात नगर परिषद अस्तित्वात आहे काय असा प्रश्न उपस्थित करीत काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी टाऊन हॉलसमोर ठिय्या आंदोलन केले. पालिकेची सर्वसाधारण सभा सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आली होती. त्यापूर्वीच या नगरसेवकांनी आंदोलनाला सुरुवात केली. पालिकेच्या एकाही विभागाकडून कोणतीच सेवा दिली जात नाही, असा आरोप सदस्यांनी केला.
नगरपरिषदेत समाविष्ठ झालेल्या सात ग्रामपंचायत क्षेत्रात कोणतीच सुविधा दिली जात नाही. ९६ कर्मचारी काढून टाकल्याने एक महिन्यांपासून गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे सत्ताधारी कोट्यवधींचा विकास निधी आणल्याच्या डिंगा हाकत आहे. प्रत्यक्षात मात्र वार्डातील कचरा उचलणे, नाली सफाई करणे, खड्ड्यांमध्ये मुरुम टाकणे या सारखी जुजबी कामेही होताना दिसत नसल्याचा आरोप या सदस्यांनी केला. काँग्रेसचे गटनेते चंद्रशेखर चौधरी, बबलू देशमुख, राष्ट्रवादीचे पंकज मुंदे, दर्शना इंगोले, राजू केराम, ताई देवकते, विशाल पावडे, वैशाली सवाई, पल्लवी रामटेके यांनी आंदोलन केले. मुख्याधिकाऱ्यांनी त्यांच्या मागण्यांची लवकरच पूर्तता केली जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर या सदस्यांनी सभागृहात प्रवेश केला.
सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त कायम करीत असताना काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. वडगाव परिसरातून नगरपालिकेने अडीच कोटींचा कर गोळा केला आहे. प्रत्यक्षात मात्र २० लाखांचेही काम या भागात झाले नसल्याचा आरोप पंकज मुंदे यांनी केला. अशीच अवस्था लोहारा, वाघापूर, पिंपळगावसह सातही ग्रामपंचायत क्षेत्राचे असल्याचे सांगितले. आरोग्य व बांधकाम विभागाच्या कामकाजावर विरोधी सदस्यांनी ताशेरे ओढले. सत्ताधारी केवळ त्यांच्या प्रभागापुरताच विचार करीत असल्याचा आरोप चंद्रशेखर चौधरी यांनी केला. या बैठकीत चर्चेला आलेले सर्वच विषय मंजूर झाले. यामध्ये शहरातील चारही झोनमध्ये रस्त्याचे डांबरीकरणाने पॅच दुरुस्त करणे, टंचाई काळात साफ झालेल्या विहिरींवर जाळी बसविणे, नगरोत्थान महाअभियान आदी कामांचा समावेश आहे.
कमी मनुष्यबळात सेवा देण्याचे आव्हान
कमी मनुष्यबळात कामाचे नियोजन केले जात आहे. शहरातील मोकाट जनावरे, डुक्कर पकडणे, घनकचरा उचलणे, कंत्राटी कर्मचारी नियुक्ती, मुरुमाच्या निविदा मंजुरीची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्याधिकारी अनिल अढागळे यांनी प्रशासनाची भूमिका स्पष्ट करताना, सभागृहात सांगितले. याशिवाय सर्व विभाग प्रमुख, झोन अभियंते, आरोग्य निरीक्षक, वार्ड शिपाई यांना मोबाईल सुरू ठेऊन तक्रारींचे निरसन करण्याबाबत निर्देश दिले असल्याचे अढागळे यांनी सांगितले. सर्वसाधारण सभा नगराध्यक्ष कांचन चौधरी यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या सभेत विषय पटलावरील मलनिस्सारणाचा विषय वगळून सर्वांनाच मंजूर करण्यात आले.

Web Title: Corporators movement against municipal administration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.