लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : वाढीव क्षेत्रातील मालमत्तांवर करण्यात आलेली नवीन कर आकारणी अन्यायकारक असून त्याविरूद्ध रान पेटविणाऱ्या नगरसेवकांची स्टंटबाजी शनिवारी उघड झाली. सर्वसाधारण सभेत हा मुद्दा प्रथम चर्चेत घेण्याची आग्रही मागणी करणारे आणि आंदोलन करणारे नगरसेवकच निर्णायकवेळी सभागृहातून गायब झाले. अध्यक्षांनीच आमची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडावी, अशी पळवाट त्यांनी शोधली.शनिवारी सर्वसाधारण सभा सुरू होण्यापूर्वी भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस नगरसेवकांनी सभागृहाबाहेर बसून शासनाविरूद्ध नारेबाजी केली. वाढीव कर आकारणी चुकीची असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला. यापूर्वी जिल्हाधिकाºयांना निवेदन देऊन कर आकारणी निविदा प्रक्रिया नियमबाह्य असल्याची ओरड त्यांनी केली होती. वारेमाप कर आकारल्याच्या तक्रारी भाजपा नगरसेवक व सभापतींनीच केल्या होत्या. त्याला विरोधकांचीही साथ मिळाली. याच मुद्यावर सभागृहात भूमिका मांडण्याची वेळ आली, तेव्हा मात्र प्रत्येकाने सोयीची भूमिका घेत सभेतून काढता पाय घेतला. यावरून त्यांची दांभिकता उघड झाली.नगरपरिषद अधिनियमातील कलम १०६ नुसार कर निर्धारण व प्रक्रियेसंदर्भात विरोध करणाºयांचे सदस्यत्व रद्द होत असल्याचे सीओ ज्ञानेश्वर ढेरे यांनी सभागृहात स्पष्ट करताच त्यांची बोबडी वळली. यामुळे वाढीव क्षेत्राच्या कर आकारणीला विरोध करणाऱ्यांचे पितळ उघडे पडले. सदस्यत्व धोक्यात येण्याची शक्यता लक्षात घेऊन त्यांचा सूर मावळला.दुसºया सत्रात सभा सुरू होताच नगराध्यक्ष कांचन चौधरी यांनी कर आकारणीवर खूप चर्चा खूप झाली, आता ठराव घ्या, असे सूचविले. ही बाब राज्यशासनाच्या कायदेशीर चौकटीत येत असल्याने मुख्यमंत्री, पालकमंत्री, नगरविकास राज्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचा प्रस्ताव त्यांनी ठेवला. मात्र त्यावर सर्व सदस्य गप्प बसले. बाहेर गेलेल्या काही सदस्यांना फोन करून बोलविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, प्रतिसाद मिळाला. शेवटी भाजपा गटनेते विजय खडसे यांनी नगराध्यक्षांनीच सभागृहाची भावना जिल्हाधिकाऱ्यांपुढे मांडावी, एवढाच प्रस्ताव ठेवला. नगराध्यक्षांनी त्यांना स्पष्ट भूमिका सांगा, असे म्हणताच सभागृहात पुन्हा निरव शांतता पसरली.अखेर कर आकारणीचा मुद्दा अधांतरीच राहिला. नंतर विषय पत्रिकेतील घनकचरा व स्वच्छतेच्या मुद्यावरून भाजप पदाधिकारी व नगरसेवकांनीच आक्रमक पवित्रा घेत वर्षभरात कोणतेच काम झाले नसल्याची कबुली चर्चेत दिली.कार्यकाळ संपूनही सभापतींना ट्रॅक्टरच नाहीभाजपाच्या शिक्षण सभापतींनी पहिल्या दिवसापासून प्रभागात ट्रॅक्टर नसल्याची तक्रार केली. वर्ष लोटूनही त्याची ट्रॅक्टरची पूर्तता झाली नाही. बहुमत असताना पदाधिकाºयांचीच ही स्थिती आहे, तर इतर नगरसेवकांचे काय, असाही प्रश्न यावेळी त्यांनी उपस्थित केला. प्रशासन ऐकत नसल्याने सर्वच अगतिक असल्याचे यावरून स्पष्ट झाले. यावरून भाजपा सदस्यांना दैनंदिन कामकाज करून घेण्यातही अपयश येत असल्याचे स्पष्ट झाले.
नगरसेवकांचा स्टंट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 10:34 PM
वाढीव क्षेत्रातील मालमत्तांवर करण्यात आलेली नवीन कर आकारणी अन्यायकारक असून त्याविरूद्ध रान पेटविणाऱ्या नगरसेवकांची स्टंटबाजी शनिवारी उघड झाली. सर्वसाधारण सभेत हा मुद्दा प्रथम चर्चेत घेण्याची आग्रही मागणी करणारे आणि आंदोलन करणारे नगरसेवकच निर्णायकवेळी सभागृहातून गायब झाले.
ठळक मुद्देवाढीव कर आकारणी : निर्णायक वेळीच गायब