रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जीवनावश्यक असलेला भाजीपाला रविवारी भाजी मंडीत विक्रीला आला. भाजी खरेदी करण्यासाठी व्यापाºयांनी आणि जनसामान्यांनी गर्दी केली. मात्र पोलीस प्रशासनाने गर्दी रोखून धरली. यामुळे लाखोंचा भाजीपाला विक्रीअभावी मातीमोल झाला.शनिवारी दत्त चौक, जाजू चौक आणि आठवडी बाजार परिसरातील भाजी दुकाने बुलडोझरने तोडली गेली. जे विक्रेते हटण्यास तयार नव्हते, अशांवर लाठ्या बरसल्याचा आरोप चिल्लर विक्रेत्यांनी रविवारी केला. या घटनेचे पडसाद रविवारी पहायला मिळाले. भाजी मंडीत पहाटेपासूनच पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. या ठिकाणी भाजी खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना रोखले गेले. चिल्लर विक्रेत्यांना पूर्णत: प्रवेशबंदी करण्यात आली होती. यामुळे ज्या व्यावसायिकांनी भाजी खरेदी केली, त्यांची मोठी पंचाईत झाली.रविवारी ३०० टन भाजीपाला विक्रीकरिता भाजी मंडीत आला होता. या वाहनांनी बाजारपेठ भरली होती. मोठ्या प्रमाणात भाजीपाला आल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले होते. या स्थितीत भाजीपाला खरेदी करणारे ठोक आणि चिल्लर विक्रेते नव्हते. यामुळे शेतकºयाचा शेतमाल भाजी मंडीतच सडला. काही शेतकऱ्यांनी हा शेतमाल परत नेला. काही शेतकऱ्यांना तो परत घेऊन जाणेही जमले नाही. गर्दी नियंत्रित करण्यासाठी पोलीस वाहनांचा ताफा भाजीमंडीत होता. गर्दी रोखणे पोलिसांनाही कठीण गेले. पोलीस प्रशासनाला मदत करण्यासाठी रोटरी क्लबने मदतीचा हात दिला. गर्दी नियंत्रणासाठी गेटच्या बाहेर माईकवरून घोषणा करण्यात येत होती. यामध्ये अनंत पांडे, राजेश गडीकर, अजय म्हैसाळकर, दिलीप राखे, आनंद जैन यांचा समावेश होता.विक्रेते म्हणतात, आमचा काय गुन्हा?आम्हाला ११ वाजतापर्यंत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश शनिवारी मिळाले. ११ वाजता दुकाने बंद केले. तर पोलिसांनी बुलडोझर चालवित दुकाने उचलली. अनेक दुकाने तुटली. आम्हाला सांगितले असते तर आम्हीच दुकाने हटविली असती, असे मत गोलू जुमनाके, शरिफ खान, किशोर फुलवाले, मिलिंद घोसे यांनी व्यक्त केले. शेख शफी यांनी पोलिसांनी मारहाणीचा निषेध नोंदविला. भाजी मंडीतील खरेदीदारी जाफर खान यांनी भाजीची खरेदी केली. त्याचा ट्रकभरून गावात वितरण करणार असल्याचे जाहीर केले. भाजीपाला, लसूण आणि कांद्याची किट त्यांनी तयार केली.शेतकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रियाआता शेतीला लावलेला पैसाही निघणार नाही. मजुरीलाही पैसे नाही, अशी व्यथा जांब येथील सचिन राऊत यांनी मांडली. सचिन लढे हे शेतकरी म्हणाले, शिमला मिरचीच्या उत्पादनाला मोठा खर्च आला. पण मिरची विकल्याच गेली नाही. अशीच अवस्था राहिली तर भाजीपाल्याचा प्लॉट खराब होईल. दहीफळचे जगदीश चव्हाण म्हणाले, तालुक्याचा बजार बंद आहे. यामुळे जिल्ह्याच्या ठिकाणी भाजी आणली. आता जिल्ह्याच्या ठिकाणी भाजी विक ता येत नाही. कोबी, काकडी, वांगे हा शेतमाल परत न्यावा लागत आहे. जनावरांनाच तो टाकाव लागेल. हंसराज सोमवंशी म्हणाले, ३५ हजार रूपयाचा माल विकता आला नाही. शेतकºयांना खर्चालाही भाजी परवडला नाही. अरविंद बेंडे, बोरगावचे अशोक भुतडा म्हणाले, आता भाजी तोडली नाही तर संपूर्ण भाजीपाला खराब होतो. विक्रीसाठी नियोजन करायला हवे.भाजी विक्री बंद करणारजिल्हा प्रशासनाने जीवनावश्यक वस्तूमधून भाजीपाला वगळला. यामुळे भाजी विक्रेत्यांना बोलावण्यात आले होते. आता खरेदी करणाºयांवर अशा लाठ्या बरसल्या, विक्रेत्यांचे हाल होत आहेत. मग भाजी विकायची कशासाठी? आम्ही दुकाने मंगळवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती भाजी विक्रेता संघटनेचे अध्यक्ष गजानन बरे आणि सचिव आयूब शेख यांनी दिली. जिल्हा प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.
यवतमाळच्या मंडईत लाखमोलाचा भाजीपाला मातीमोल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2020 6:00 AM
रविवारी ३०० टन भाजीपाला विक्रीकरिता भाजी मंडीत आला होता. या वाहनांनी बाजारपेठ भरली होती. मोठ्या प्रमाणात भाजीपाला आल्याने बाजारात भाजीपाल्याचे दर घसरले होते. या स्थितीत भाजीपाला खरेदी करणारे ठोक आणि चिल्लर विक्रेते नव्हते. यामुळे शेतकºयाचा शेतमाल भाजी मंडीतच सडला. काही शेतकऱ्यांनी हा शेतमाल परत नेला. काही शेतकऱ्यांना तो परत घेऊन जाणेही जमले नाही.
ठळक मुद्देव्यापाऱ्यांनाही प्रवेश मिळाला नाही : चिल्लर व्यापाऱ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप, दुकानेही पाडण्यात आली