शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
2
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
3
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
4
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
5
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
6
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
7
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
8
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
9
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
10
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
11
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
12
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
13
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
14
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
15
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
16
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
17
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
18
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
19
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
20
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये

बोंडअळीने देशातील कॉटन इंडस्ट्रीज अडचणीत; कापसाचे उत्पादन निम्म्याने घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2017 10:14 AM

यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक लांबी व तलम असलेल्या कापसाची प्रतीक्षा असते. परंत बोंडअळीमुळे गुणवत्ता घसरल्यामुळे त्यांनी यवतमाळच्या कापसाकडे पाठ फिरविली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

राजेश निस्ताने ।आॅनलाईन लोकमतयवतमाळ : कापसाला मिळणारा अत्यल्प हमीभाव दरवर्षी गाजतो. पण ही लूटही कमी वाटावी इतका गंभीर हल्ला यंदा बोंडअळीने केला आहे. हिरव्यागार बोंडाकडे पाहून शेतकरी खूश होते. पण बोंड फोडून पाहिले तर, प्रत्येक बोंडात अळी. आता फवारणी करूनही कापूस पिकविण्याची संधी नाही. उभ्या झाडांचे मरण पाहणे एवढेच शेतकऱ्यांच्या हाती उरले आहे. त्याचा मोठा फटका कॉटन इंडस्ट्रीजलाही सहन करावा लागत आहे. बोंडअळी रोखण्यासाठी केलेल्या फवारणीने विदर्भातील ५० पेक्षा अधिक शेतकरी-शेतमजूर मरण पावले, ते वेगळेच.बोंडअळीच्या हल्ल्याची व्याप्ती विदर्भ, मराठवाडा व तेलंगणापर्यंत आहे. देशातील सर्वाधिक टेक्सटाईल इंडस्ट्रीज दक्षिणेत आहेत. त्या इंडस्ट्रीजला नेहमीच यवतमाळ जिल्ह्यातील सर्वाधिक लांबी व तलम असलेल्या कापसाची प्रतीक्षा असते. परंत बोंडअळीमुळे गुणवत्ता घसरल्यामुळे त्यांनी यवतमाळच्या कापसाकडे पाठ फिरविली आहे. त्याचा फटका खासगी जिनिंग-प्रेसिंग व्यावसायिकांनाही बसतो आहे. विदर्भात ४०० पेक्षा अधिक खासगी जिनिंग-प्रेसिंग असून त्यातील शंभरहून अधिक जिनिंग बंद आहेत.सध्या शेतकऱ्यांच्या हाती जो कापूस येतोय त्याची गुणवत्ता कमालीची खालावली आहे. कवडी, किडक, बारक बोंड याचा सामना करावा लागत आहे. शेतकऱ्यांकडून विक्रीसाठी येणारा कापूस दर्जेदार नाही, कीडयुक्त कापसापासून तयार झालेल्या रूईगाठी निर्यात योग्य नाहीत. हा माल विक्री करताना जिनिंग व्यावसायिकांच्या नाकीनऊ आले आहे. त्यामुळे भविष्यात कापसाला भाव वाढण्याची चिन्हे नाहीत. सद्यस्थितीत चांगल्या कापसाला अधिकाधिक ४६०० रुपयापर्यंत भाव मिळत आहे.बोगस बीटीमुळे चांगले बियाणे वांध्यातराज्यात काही भागात स्वस्तात मिळणाऱ्या बोगस बिटीचा पेरा झाला. या बोगस बीटीवर बोंडअळीचे आक्रमण झाले. नंतर याच अळ्यांनी नामांकित बिटी बियाण्यांवरही हल्ला चढविला. ही बोंडअळी जमिनीत रुजली असून पुढच्या वर्षीसुद्धा कपाशीवर बोंडअळीचा हल्ला होण्याची शक्यता आहे.दरवर्षी फरदड कापूस निघत असल्याने फेब्रुवारी-मार्चपर्यंत शेतकरी प्रतीक्षा करतात. परंतु यावर्षी डिसेंबर अखेरच शेताची उलंगवाडी (हंगाम संपणे) करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अर्थात शेतकऱ्यांचा कापसाचा सिझन यंदा डिसेंबरमध्येच संपणार आहे.

बोंडअळीने कापसाची गुणवत्ताच संपविली. त्यामुळे अशा कापसापासून तयार होणाऱ्या रूईगाठींना दक्षिणेत मागणीच नाही. टेक्सटाईल इंडस्ट्रीजकडून मालाला उठावच नसल्याने विदर्भातील खासगी कॉटन उद्योग संकटात सापडले आहेत. बोंडअळीचा कृषी खात्याने आत्ताच बंदोबस्त करणे अपेक्षित आहे. अन्यथा पुढच्या वर्षी खरीप हंगामात पुन्हा बोंडअळीचा हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.- नौशाद काराणी, संचालक, खासगी जिनिंग-प्रेसिंग, यवतमाळ.बोंडअळीच्या आक्रमणामुळे कापसाचे सरासरी उत्पन्न आणि गुणवत्ताही घटली आहे. पुढील वर्षी या अळीचे आक्रमण होऊ नये म्हणून यंदा शेतकऱ्यांनी फरदड घेऊ नये, यासाठी कृषी विभाग जनजागृती करीत आहे.- सुभाष नागरे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती.

टॅग्स :agricultureशेती