लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मार्च एंडिगनंतर कापसाचे दर वधारले आहे. सध्या कापूस सहा हजार २०० रूपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. गेल्या महिनाभरात कापसाच्या दरात क्विंटलमागे ८०० रूपयांची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र या वाडीचा दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत आहे.शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच बाजारपेठेत कापसाचे दर वाढण्यास सुरूवात झाली. कापसाचे दर तूर्तास सहा हजार रूपये क्विंटलच्यावर पोहोचले आहेत. या दरात आणखी किती वाढ होते याकडे व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. सामान्य शेतकऱ्यांनी यापूर्वीच कापसाची विक्री केली. काही मोठ्या शेतकऱ्यांकडे थोड्या प्रमाणात कापूस साठवून आहे. बहुताश कापूस व्यापाऱ्याजवळच साठवून आहे. त्यांनाच या वाढीव दराचा लाभ होत आहे.गत दोन वर्षांपासून कापसाला सहा हजार रूपये दर मिळतील म्हणून शेतकऱ्यांनी कापूस रोखून ठेवला होता. मात्र दर वाढण्याची शाश्वती नसल्याने बहुतांश शेतकºयांनी कापूस विक्रीकरिता काढला. शेतकऱ्यांकडील कापूस संपताच बाजारपेठेत कापसाचे दर सहा हजार २२४ रूपये प्रति क्विंटलपर्यंत चढले आहे. राळेगाव येथे कापसाला हा दर मिळाला. यवतमाळात सहा हजार १०० रूपयांचा दर होता. राज्यातील काही बाजारापेठेत अशीच स्थिती आहे. सरकीचे दर वधारल्याने कापसाच्या दरात वाढ झाली. तसेच रूपयाचे अवमूल्यन कायम असल्याने कापसाच्या दरात तेजी आल्याचे सांगितले जाते. बहुतांश शेतकऱ्यांनी आपले पांढरे सोने आधीच विकले आहे. आता वाढलेल्या दराचा फायदा अवघ्या काही शेतकऱ्यांनाच होणार आहे.गुढीपाडव्यानंतर विक्रीस येणार कापूसकाही मोजक्याच शेतकऱ्यांकडे आता कापूस साठवून आहे. हे प्रमाण अत्यंत नगण्य आहे. गुढीपाडव्यापर्यंत असे शेतकरी कापूस दरवाढीची प्रतीक्षा करतील . त्यानंतरत्ते कापूस विक्रीस काढतील, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. यामुळे गुढीपाडव्यापर्यंत कापूस दर काय राहतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कापूस पोहोचला ६२०० वर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2019 10:11 PM
मार्च एंडिगनंतर कापसाचे दर वधारले आहे. सध्या कापूस सहा हजार २०० रूपये प्रति क्विंटलवर पोहोचला आहे. गेल्या महिनाभरात कापसाच्या दरात क्विंटलमागे ८०० रूपयांची घसघशीत वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र या वाडीचा दराचा लाभ व्यापाऱ्यांनाच होत आहे.
ठळक मुद्देगुढीपाडव्याची प्रतीक्षा : महिनाभरात दर ८०० रूपयांनी वधारले