कपाशी लदबदली : कधी नव्हे ती काळी आई आपल्या लेकरावर-शेतकऱ्यावर यंदा प्रसन्न झाल्याचे दिसत आहे. पाऊस अपुरा असलातरी योग्य वेळी बरसलेल्या या पावसाने जिल्ह्यात सर्वत्र पीक परिस्थिती उत्तम आहे. यवतमाळ तालुक्यातील एका शेतात कपाशी पात्या-बोंडांनी लदबदली आहे. सोयाबीन आणि तुरीचीही स्थिती उत्तम असल्याने गत काही वर्षात दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा चांगले दिवस येण्याची आशा आहे.
कपाशी लदबदली
By admin | Published: September 22, 2015 3:34 AM