लोकमत न्यूज नेटवर्कपांढरकवडा : जिल्ह्यात सर्वाधिक पांढरे सोने पिकविणाऱ्या पांढरकवडा तालुक्यात यावर्षी कपाशीचा पेरा मागीलवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात कपाशीचा पेरा पाच टक्क्याने कमी झाला होता. त्यात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.तालुक्यात ५२ हजार ९११ हेक्टर जमीन लागवडीयोग्य आहे. यापैकी ४० ते ४१ हजार हेक्टर जमिनीत यावर्षी कापाशीचा पेरा होणार असल्याची शक्यता आहे. आठ ते १० हजार हेक्टर जमिनीत सोयाबीन व उर्वरित जमिनीत तूर आणि इतर पिकांचा पेरा होणे अपेक्षित आहे. जमिनीच्या मशागतीची कामे संपत आली असून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे. शेतकऱ्यांनी बि-बियाणांची जमवाजमव करणे सुरू केले आहे. बि-बियाणांची सोय करण्यासाठी शेतकरी सावकारांचे उंबरठे झिजविताना दिसत आहे. मागीलवर्षीचे बँकेचे कर्ज थकीत असल्यामुळे यावर्षी बि-बियाणे व खतांची सोय कशी करावी, या विवंचनेत शेतकºयांनी मागीलवर्षी कपाशीऐवजी दुसरा पर्याय शोधत सोयाबीन, हळद व इतर पिके घेण्याचा प्रयत्न केला. परंतु याचा काहीही फायदा झाला नाही. तालुक्यात कपाशीचे पीक हे मुख्य पीक असून या भागातील जमीन कपाशीच्या पिकासाठी अतिशय चांगली आहे. कपाशीच्या आलेल्या नवीन जातीच्या बियाणाची लागवड सर्वप्रथम या भागात केली जाते. शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून उत्पादन वाढीसाठी प्रयत्न करणारे शेतकरी या तालुक्यात आहे. परंतु उत्पादन वाढ होऊनही खर्चाएवढाही भाव शेतमालकाला मिळत नसल्याची शेतकऱ्यांची खंत आहे. यावर्षी मान्सून लांबणीवर पडल्यामुळे उत्पादनावर त्याचा परिणमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बियाणे व रासायनिक खताच्या काळाबाजारावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे.पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नयेतालुक्यात काही भागात पाऊस यायच्या आधीच धुळ पेरणी केल्या जाते. यावर्षीदेखील काही शेतकऱ्यांनी कोरड्यातच पेरणी केली. शेतकऱ्यांनी शक्यतोवर पाऊस झाल्याशिवाय पेरणीला सुरूवात करू नये, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी गोपाल शेरखाने यांनी केले आहे. शासनाची मान्यता असलेले बियाणेच पेरणीसाठी वापरावे, इतर कोणतेही अप्रमाणित बियाणे वापरू नये, असेही ते म्हणाले.
पांढरकवडा तालुक्यात कपाशीचा पेरा वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 10:17 PM
जिल्ह्यात सर्वाधिक पांढरे सोने पिकविणाऱ्या पांढरकवडा तालुक्यात यावर्षी कपाशीचा पेरा मागीलवर्षीच्या तुलनेत वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या दोन वर्षात कपाशीचा पेरा पाच टक्क्याने कमी झाला होता. त्यात वाढ होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे.
ठळक मुद्देखरीप हंगाम : सोयाबीनचा पेरा घटण्याची शक्यता, शेतकऱ्यांची लगबग सुरू