लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : गतवर्षी गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशी उध्वस्त झाली. तरीही यावर्षी जिल्ह्यात कपाशीचाच सर्वाधिक पेरा आहे. मात्र मोठ्या प्रमाणात चोर बीटी बियाणे विकले गेल्याने कृषी विभागाचे लक्तरे वेशीवर टांगली आहे.जिल्ह्यात ८५ टक्के पेरण्या आटोपल्या आहे. तसा अहवाल तलाठ्यांनी कृषी विभागाला सादर केला. या अहवालानुसार जिल्ह्यात सर्वाधिक पेरा कापसाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्यावर्षी २०१६-१७ मध्ये जिल्ह्यात चार लाख २० हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली होती. बोंडअळीच्या आक्रमणानंतरही यावर्षी चार लाख १९ हजार हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे. १५ टक्के पेरणीचा अहवाल अद्याप बाकी आहे. यामुळे कापसाचे पेरा क्षेत्र आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.कापूस लागवडीला शेतकऱ्यांची पहिली पसंती दिली. गतवर्षी मोठ्या प्रमाणात बोंडअळीने नुकसान झाल्यानंतरही यावर्षी शेतकºयांनी कपाशीला पहिली पसंती दिल्याचे यावरून दिसून येते. त्या प्रमाणात लागवड करण्यासाठी लागणारे बियाणे मात्र कृषी केंद्रातून विकले गेले नसल्याचे समोर आले आहे. यामुळे अतिरिक्त बियाणे आले कुठून, हा संशोधनाचा विषय आहे. चोर बीटीचा मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात शिरकाव झाल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.कृषी विभागाच्या यंत्रणेने कारवाईचा बडगा उगारल्यानंतरही चोर बीटी बियाणे जिल्ह्यात आलेच कसे, हासुद्धा संशोधनाचा विषय आहे. कीडीच्या आक्रमणानंतरच चोर बीटीचे वास्तव पुढे येण्याची शक्यता आहे.
कापसाचाच पेरा सर्वाधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 11:26 PM
गतवर्षी गुलाबी बोंडअळीने आक्रमण केल्याने कपाशी उध्वस्त झाली. तरीही यावर्षी जिल्ह्यात कपाशीचाच सर्वाधिक पेरा आहे. मात्र मोठ्या प्रमाणात चोर बीटी बियाणे विकले गेल्याने कृषी विभागाचे लक्तरे वेशीवर टांगली आहे.
ठळक मुद्देचोर बीटीची विक्री : कृषी विभागाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह