आचारसंहितेचे सावट : गोंधळातच कंत्राटांच्या प्रस्तावांना मंजुरी यवतमाळ : नगर परिषदेची सर्वसाधारण सभा गुरूवारी सकाळी ११ वाजता घेण्यात आली. नगराध्यक्षांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या सभेत काही प्रस्तावित विकास कामांना मंजुरात देण्याची प्रक्रीया सुरू होती. मात्र निवडणुक विभागाची कुठलीही परवानगी न घेता आदर्श आचारसंहितेचा भंग करीत ही सभा तर घेण्यात आली नाही ना, असा आक्षेप नगरसेवक प्रवीण प्रजापती यांनी घेतला. त्यामुळे या सभेत चांगलाच वादंग निर्माण झाला होता. शहरातील विद्युत पथदिवे चालू-बंद करण्याचा कंत्राट आणि अतवृष्टीत खड्डे पडलेल्या रस्त्यांचे डांबरीकरण यासह काही विकास कामांचे प्रस्ताव तयार करण्यात आले होते. त्याला सर्वसाधारण सभेचा ठराव आणि मंजूरात घेणे आवश्यक होते. त्यामुळे गुरूवारी सकाळी ११ वाजता नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत संबंधित विकास कामांचा ठराव आणि मंजूरात देण्याच्या प्रकियेला सुरूवात होणार होती.
सभेवर २१ नगरसेवकांचा आक्षेप
By admin | Published: June 06, 2014 12:12 AM