लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २३ मे रोजी येथील दारव्हा रोडवरील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. मतमोजणीकरिता ३१७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आाली असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.गेल्या ११ एप्रिल रोजी यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघासाठी पहिल्या टप्प्यात मतदान पार पडले. एकूण ६१.०८ टक्के मतदान झाले आहे. या लोकसभा मतदारसंघात वाशिम, कारंजा, राळेगाव, यवतमाळ, दिग्रस आणि पुसद या सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. प्रत्यक्ष मतदानापासून जवळपास दीड महिन्याच्या अंतराने म्हणजे २३ मे रोजी मतमोजणी होत आहे.यासाठी जिल्हा प्रशासनाने १०७ मतमोजणी पर्यवेक्षक, १०२ सहायक आणि १०८ सूक्ष्मनिरीक्षक असे एकूण ३१७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. मतमोजणीला सकाळी ८ वाजता सुरवात होईल.शासकीय धान्य गोदामाच्या हॉल क्रमांक एकमध्ये वाशिम विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी, हॉल क्रमांक दोनमध्ये कारंजा मतदारसंघ, हॉल क्रमांक तीनमध्ये राळेगाव, हॉल क्रमांक चारमध्ये यवतमाळ, हॉल क्रमांक पाचमध्ये दिग्रस आणि हॉल क्रमांक सहामध्ये पुसद विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणीकरिता १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक टेबलवर एक पर्यवेक्षक, एक सहायक व एक सूक्ष्मनिरीक्षक राहणार आहे. जिल्हा पोलीस, राज्य सशस्त्र पोलीस दल, केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान तैनात आहे.टपाली मतमोजणी अधिकारी कक्षातटपाली मतपत्रिका व सेना दलातील मतदारांच्या प्राप्त झालेल्या टपाली मतपत्रिकांची मोजणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कक्षात केली जाणार आहे. टपाली मतपत्रिकांच्या मोजणीकरिता तीन टेबल व सेना दलातील टपाली मतपत्रिकांच्या मतमोजणी पूर्व स्कॅनिंगकरिता पाच टेबलची व्यवस्था आहे.
लोकसभेचे ‘काऊंट डाऊन’ सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 9:36 PM
लोकसभेच्या यवतमाळ-वाशिम मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी २३ मे रोजी येथील दारव्हा रोडवरील शासकीय धान्य गोदामात होणार आहे. मतमोजणीकरिता ३१७ अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आाली असून मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
ठळक मुद्देगुरुवारी मतमोजणी : प्रशासन सज्ज, ३१७ अधिकारी-कर्मचारी नियुक्त