हरीओम बघेल ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : न्यायालय म्हटले की शेकडो लोकांची वर्दळ आलीच. येथे येणाऱ्या लोकांना अनेकदा तंबाखू, बीडी, शिगारेट, पान, खर्रा ही व्यसने सोडवत नाही. या व्यसनी लोकांमुळे न्यायदेवतेचा परिसर गलिच्छ होतो. मात्र येथील न्यायालयात न्याय देण्यासोबतच आता तंबाखूमुक्तीसह नैतिकतेचे धडे दिले जात आहे. त्यासाठी न्यायाधीश चैतन्य कुळकर्णी यांनी विशेष पुढाकार घेतला आहे.खटल्यांसह विविध कामांसाठी न्यायमंदिराच्या परिसरात येणारे लोक खर्रा, तंबाखू खाऊन परिसरात थुंकतात. त्यातून न्यायमंदिराचा परिसर खराब करण्यासह स्वत:चे आरोग्यही धोक्यात घालतात. हे चित्र पाहून न्यायाधीश चैतन्य कुळकर्णी अस्वस्थ झाले. त्यावर उपाय करण्यासाठी त्यांनी सहकारी न्यायाधीश तथा वकील संघासोबत चर्चा केली. या चर्चेत परिसर तंबाखूमुक्त करण्याचा ठराव सर्व सहमतीने घेण्यात आला. ११ सप्टेंबर २०१७ पासून हे काम सुरू करण्यात आले. त्यासाठी काही नियम बनविण्यात आले.यामध्ये आपण स्वत: पहिले तंबाखू न्यायालय परिसरात आणायचा नाही, न्यायालयाच्या गेटवर सुरक्षा रक्षकाने त्याबाबत तपासणी करावी, या तपासणीला इतर लोकांसह न्यायालयीन कर्मचारी, वकील, पक्षकारांनीही सहकार्य केलेच पाहिजे. तपासणी केल्यानंतरच आणि सोबत तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ नसल्याची खातरजमा झाल्यानंतरच संबंधिताला आत सोडले जाते. इतकेच नव्हेतर खुद्द न्यायाधीशदेखील स्वत: तपासणी करून घेतात. विशेष म्हणजे, या प्रक्रियेतूनही कोणी सुटले आणि न्यायालय परिसरात तंबाखू सेवन करताना आढळले तर त्याला १२०० रुपये दंड केला जातो.तंबाखूमुक्तीचे हे काम नेटाने व्हावे, यासाठी न्यायाधीश चैतन्य कुळकर्णी स्वत: दररोज अर्धा तास गेटवर थांबतात. सकाळी १०.३० ला ते स्वत: हजार असतात. स्वत: न्यायाधीशच तपासणीवर लक्ष ठेऊन असल्याने कोणाचीही तंबाखू घेऊन न्यायालय परिसरात येण्याची हिमत होत नाही. गेल्या दीड वर्षापासून आर्णीचे न्यायालय तंबाखूमुक्त झाल्याचे चित्र आहे. या परिसरात कुठेही पान, तंबाखू, खर्रा यांच्या पिचकाºया आढळत नाही.अनेकांचे व्यसन सुटलेआर्णी न्यायालयात काम करणाºया अनेक कर्मचाऱ्यांचे तंबाखूचे व्यसन या मोहिमेमुळे सुटले आहे. त्यातून अनेक कुटुंबांनी समाधान व्यक्त केले आहे. व्यसन सुटलेल्या अशा अनेकांनी न्यायाधीश चैतन्य कुळकर्णी यांच्याकडे येऊन कबुली दिली आहे.तंबाखूमुक्तीचा आम्ही ठराव घेतला. त्यासाठी वकील संघ व कर्मचाºयांसोबत चर्चा केली. दररोज सातत्याने तपासणी होत असल्याने त्याचा फायदा झाला. अनेकांची तंबाखूची सवय बंद झाली. न्यायालयाचा परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत झाली. इतर शासकीय कार्यालयांनीही हे अभियान राबविले पाहिजे.- न्या.चैतन्य कुळकर्णीआर्णी
आर्णी येथील न्यायालयाने घेतला तंबाखूमुक्तीचा वसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 07, 2019 9:36 PM
न्यायालय म्हटले की शेकडो लोकांची वर्दळ आलीच. येथे येणाऱ्या लोकांना अनेकदा तंबाखू, बीडी, शिगारेट, पान, खर्रा ही व्यसने सोडवत नाही. या व्यसनी लोकांमुळे न्यायदेवतेचा परिसर गलिच्छ होतो. मात्र येथील न्यायालयात न्याय देण्यासोबतच आता तंबाखूमुक्तीसह नैतिकतेचे धडे दिले जात आहे.
ठळक मुद्देन्यायाधीशांचा पुढाकार : वकील, पक्षकारांसह सर्वांची तपासणी