लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : वृद्ध विधवा आईला घराबाहेर हाकलून देणाऱ्या मुलाला आणि सुनेला येथील न्यायालयाने दणका दिला. या वृद्ध आईला घरात ठेवण्यासोबतच दरमहा दहा हजार रुपयांची खावटी द्यावी, असा आदेश देण्यात आला.मीराबाई नारायण राठोड (नाईक) असे न्यायालयातून न्याय मिळवावा लागणाºया आईचे नाव आहे. त्या तालुक्यातील ढाणकी येथील रहिवासी आहेत. त्यांचे पती नारायण पणंतू नाईक यांचे पूर्वीच निधन झाले आहे. मुलगा शिवप्रसाद राठोड व सून लक्ष्मीबाई यांच्यासोबत ती राहते. मात्र मुलगा आणि सुनेने तिला सांभाळ करीत नाही म्हणून घरातून काढून दिले. वृद्ध मीराबाईने ९ जानेवारी रोजी येथील न्या.शाम तोंडचिरे यांच्या न्यायालयात प्रकरण दाखल केले. न्यायाधीशांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून २७ दिवसात या प्रकरणात निर्णय देताना अर्जदाराचा अर्ज अंशत: मंजूर केला. वृद्ध मीराबाईला मुलगा व सून यांनी दरमहा न चुकता दहा हजार रुपये खावटी द्यावी. तसेच तिला घरात राहू द्यावे. बिटरगाव पोलिसांनी मीराबाईला संरक्षण द्यावे, असा आदेश दिला.आईने शिकविला धडाछोट्या मुलांना कधी प्रेमाने तर कधी डोळे वटारुन आई रस्त्यावर आणते. मात्र तीच आई म्हातारी झाल्यावर मुले हाताबाहेर जातात. पण वृद्ध मीराबाईने म्हातारपणातही कोर्टात जाऊन का होईना लेकाला ताळ्यावर आणले, अशी प्रतिक्रिया गावात व्यक्त होत आहे.
आईला घराबाहेर काढणाऱ्या मुलाला कोर्टाचा दणका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:43 PM
वृद्ध विधवा आईला घराबाहेर हाकलून देणाऱ्या मुलाला आणि सुनेला येथील न्यायालयाने दणका दिला. या वृद्ध आईला घरात ठेवण्यासोबतच दरमहा दहा हजार रुपयांची खावटी द्यावी, असा आदेश देण्यात आला.
ठळक मुद्देघरात घेण्याचा आदेश : दरमहा दहा हजार रुपये द्या