लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : तालुक्यातील कान्हाळगाव येथील एका शेतातील गोठ्याला रविवारी रात्री आग लागून संपूर्ण गोठा जळून खाक झाला. या आगीत शेतकऱ्याचे जवळपास एक लाख एक हजार ५०० रूपयांचे नुकसान झाले.रविवारी रात्रीच्या सुमारास कान्हाळगाव येथील सुभाष रघुनाथ कोरडे यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रात्रीची वेळ असल्याने ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. गावाबाहेर रात्री आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. गोठ्याबाहेर बांधून असलेली जनावरे गावकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने मोकळी केली. मात्र या आगीत एक गाय ७० टक्के जळाली. या आगीत शेतकºयाचा कापूस, तूर, टिनपत्रे, जनावरांचे वैरण, शेती उपयोगी अवजारे आदी साहित्य जळून खाक झाले. सोमवारी महसूल प्रसासनाच्यावतीने तलाठी व्ही.आर. उमाटे यांनी घटनास्थळी जाऊन मोका पाहणी केली. नुकसानीचा गावकºयांसमोर पंचनामा केला आणि तहसील प्रशासनाला माहिती दिली. ऐन शेतीहंगामाच्या तोंडावर झालेले नुकसान पाहता, संबंधित शेतकऱ्याला आर्थिक मदत करावी, अशी मागणी होत आहे
कान्हाळगाव येथे गोठ्याला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2020 5:00 AM
रविवारी रात्रीच्या सुमारास कान्हाळगाव येथील सुभाष रघुनाथ कोरडे यांच्या शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. रात्रीची वेळ असल्याने ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही. गावाबाहेर रात्री आगीच्या मोठ्या ज्वाळा दिसल्यानंतर गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. गोठ्याबाहेर बांधून असलेली जनावरे गावकऱ्यांनी मोठ्या प्रयत्नाने मोकळी केली. मात्र या आगीत एक गाय ७० टक्के जळाली.
ठळक मुद्देगाय होरपळली : संपूर्ण गोठा जळून खाक, लाखो रूपयांचे नुकसान