किशोर वंजारी ।लोकमत न्यूज नेटवर्कनेर : पिंपरी मुखत्यारपूर येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे पितळ महिनाभरातच उघड पडले. या पुलाला मोठमोठे तडे गेले आहे. हा प्रकार लपविण्यासाठी चक्क थर्माकोल कोंबण्याचा प्रकारही कंत्राटदाराने केला. या निकृष्ट कामाची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली जात आहे.पिंपरी मुखत्यारपूर येथे पुलाचे बांधकाम निकृष्ट होत असल्याची बाब स्पष्टपणे दिसून येत होती. गज, इतर साहित्य प्रमाणापेक्षा कमी वापरले जात असल्याचे स्पष्ट होत होते. संबंधित विभागाच्या अभियंत्यांकडून कधीही पाहणी झाली नसल्याने कंत्राटदाराने तशाच पद्धतीने काम सुरू ठेवले. आता त्याचे परिणाम पुढे येत आहे.या पुलाला पहिल्याच पावसात जागोजागी तडे गेले आहेत. भिंतीला भेगा पडल्या आहे. ही बाब जागरूक नागरिकांनी संबंधित कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी भेगा पडलेल्या ठिकाणी थर्माकोल टाकण्यात आले. झालेला गैरप्रकार पुढे येऊ नये यासाठी हा आटापिटा करण्यात आला. मात्र भविष्यात या पुलावर मोठा धोका होण्याची भीती नाकारता येत नाही.मुरूमामुळे रस्ता चिखलमयपूल आणि रस्ता समांतर करण्यासाठी टाकलेल्या मुरूमाची योग्यरित्या दबाई करण्यात आली नाही. पावसामुळे हा भाग चिखलमय झाला आहे. तेथून मार्ग काढताना वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही तारेवरची कसरत करावी लागते. या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी आहे.
मुखत्यारपूरच्या पुलावरचे तडे थर्माकोलने झाकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2018 9:44 PM
पिंपरी मुखत्यारपूर येथे बांधण्यात आलेल्या पुलाचे पितळ महिनाभरातच उघड पडले. या पुलाला मोठमोठे तडे गेले आहे. हा प्रकार लपविण्यासाठी चक्क थर्माकोल कोंबण्याचा प्रकारही कंत्राटदाराने केला.
ठळक मुद्देनिकृष्ट काम : महिनाभरातच पितळ उघडे, चौकशीची गरज