पुसद एसडीओंना निवेदन : सर्व राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचा सहभाग पुसद : गत २५ वर्षांपासून पुसद जिल्हा निर्मितीची मागणी शासनाकडे लावून धरुनही जिल्हा निर्मितीचा प्रश्न मार्गी लागला नाही. परिसरातील जनतेच्या विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांच्यावतीने मंगळवारी पुसद बंद कडकडीत पाळण्यात आला. शहरातील सर्व व्यवसाय, शैक्षणिक संस्था, व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेऊन पुसदकरांनी या आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. येथील सुभाष चौकात सकाळी १०.३० वाजता राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले. व्यापारी आणि नागरिकांचीही मोठी गर्दी झाली होती. सकाळी ११ वाजता सुभाष चौक ते नगिना चौक, गांधी चौक मार्गे शांतता मोर्चा उपविभागीय कार्यालय परिसरात येऊन धडकला. पुसद जिल्हा झालाच पाहिजे, अशा घोषणा देण्यात आल्या. यानंतर उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले यांना जिल्हा निर्मितीसंदर्भात सर्वांच्या स्वाक्षरींचे निवेदन देण्यात आले. पुसद जिल्ह्याची मागणी अनेक वर्षांपासूनची आहे. या मागणीसाठी वेळोवेळी आंदोलने करण्यात आली. परंतु हा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी बंद पुकारण्यात आला होता. शहरातील सर्व व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने शुकशुकाट दिसत होता. बंद दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गजानन शेळके यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. या बंदमध्ये पुसद चेंबर आॅफ कॉमर्स, सर्व राजकीय पक्ष, शैक्षणिक संस्था, बार असोसिएशन, पत्रकार संघटना, सर्व सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. मोर्चात भाजपाचे ज्येष्ठ नेते वसंतराव पाटील, माजी कुलगुरू डॉ. शेषराव सूर्यवंशी, आपचे नेते डॉ. काकण, नगरपरिषद उपाध्यक्ष डॉ. मोहंमद नदीम, महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष अॅड. आशिष देशमुख, राजीव गांधी पंचायत राज समितीचे केंद्रीय समन्वयक अॅड. सचिन नाईक, चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष सुरज डुबेवार, भाजपाचे विनोद जिल्हेवार, विश्वास भवरे, रवी ग्यानचंदाणी, धनंजय अत्रे, विजय पुरोहित, शिवाजी पवार, विश्वजित सरनाईक, भारत पाटील, निखील चिद्दरवार, मनसेचे अभय गडम, काँग्रेसचे महेश खडसे, ज्ञानेश्वर तडसे, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख अॅड. उमाकांत पापीनवार, विकास जामकर, अवि बहादुरे, डॉ. सूर्यकांत पद्मावार, माजी सरपंच मिलिंद उदेपूरकर, पुसद पत्रकार संघाचे अध्यक्ष अखिलेश अग्रवाल, राजस्थान मंडळाचे अध्यक्ष डॉ.टी.एन. बुब, डॉक्टर असोसिएशनचे डॉ. राजेश अग्रवाल, पुसद विकास मंचचे अॅड. चंद्रशेखर शिरे, शाकीब शाह, नारायण पुलाते, अॅड. कैलास राठोड, निशांत बयास, योगेश राजे, धनंजय सोनी, डॉ. उमेश रेवणवार, राधेश्याम जांगीड, कैलास अग्रवाल, अविनाश पोळकर, अॅड. महेश पाठक, अॅड. उमेश चिद्दरवार, सुरेश दहातोंडे, संतोष अग्रवाल, विक्रम गट्टाणी, प्रवीर व्यवहारे, संदीप जिल्हेवार, संगमनाथ सोमावार, ओम शिवलाणी, गजानन आरगुलवार, सुधीर देशमुख, अनिल शिंदे, सुशांत महल्ले, ज्योतींद्र अग्रवाल, गिरीष अग्रवाल, ए.आय. मिर्झा, सुधाकर चापके, विनायक चेवकर, दीपक जाधव, अॅड. भारत जाधव, विनायक डुबेवार, विश्वजित सरनाईक, श्रीकांत सरनाईक, इस्तीयाक भाई, राम पद्मावार, नाना शिंदे, प्रकाश पानपट्टे, यशवंत चौधरी, ओमप्रकाश शिंदे, नितीन पवार, मनोज मेरगेवार, रश्मी पानपट्टे, नीळकंठ पाटील, कैलास वांझाळ, अनिल चेंडकाळे, ललित सेता, अमोल व्हडगिरे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले होते. (तालुका प्रतिनिधी)
जिल्हा निर्मितीसाठी कडकडीत बंद
By admin | Published: July 27, 2016 12:36 AM