यवतमाळ : स्थानिक उमरसरा परिसरातील लक्ष्मीनगर येथे सुरू असलेल्या आयपीएल सट्ट्यावर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने बुधवारी रात्री धाड टाकली. या धाडीत एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले. लक्ष्मीनगर येथे सदर आयपीएल सट्ट्यावर क्रिकेट मॅचवर सट्टा लावला जात असल्याची गोपनीय माहिती एसडीपीओ पीयूष जगताप यांना मिळाली. त्यावरून त्यांनी पथकातील कर्मचाऱ्यांसह धाड टाकली. यावेळी गौरव रमेश जयस्वाल याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याजवळून रोख ११०० रुपये व सात हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये टीव्ही व मोबाईलचा समावेश आहे. कारवाईत अजय डोळे, बबलू चव्हाण आदी सहभागी झाले होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धा सुरू झाल्यापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सट्टा लावला जात आहे. मात्र पोलीस यंत्रणेचे या अड्ड्यांकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यात यवतमाळसह, पुसद, पांढरकवडा, वणी, दारव्हा, उमरखेड आदी शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात या व्यवसायातून लाखोंची उलाढाल होत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
उमरसरा येथे क्रिकेट सट्ट्यावर धाड
By admin | Published: April 28, 2017 2:23 AM