शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

शेतकऱ्यांना फसविणाऱ्या सहा व्यापाऱ्यांवर गुन्हा

By admin | Published: July 12, 2014 1:49 AM

शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांविरुद्ध उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

उमरखेड(कुपटी) : शेतकऱ्यांकडून शेतमालाची खरेदी करून त्यांचे पैसे देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सहा व्यापाऱ्यांविरुद्ध उमरखेड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तालुक्यातील खरूस येथील शेतकऱ्यांकडून दहा लाख ३५ हजार रुपयांचे धान्य खरेदी करण्यात आले होते. या प्रकाराने व्यापाऱ्यात एकच खळबळ उडाली. सागर सुभाष बदलवा, सुभाष गोपीलाल बदलवा, सत्यनारायण बालाप्रसाद दरक, आशिष सत्यनारायण दरक रा. आष्टी, ता. हदगाव, जि. नांदेड, रमेश रघुनाथ वानखडे, बालाजी राघोजी सूर्यवंशी रा. खरूस असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. उमरखेड तालुक्यातील खरूस बु. येथील शेतकरी मारोतराव वानखेडे, प्रकाश वानखडे, उत्तमराव पाटील यांनी हरभरा व्यापारी सागर बदलवा यांना दिला. सदर व्यापारी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवानाधारक आहे. गावातच खरेदी केल्यानंतर काटा पावती आणि मालाच्या किमतीचीही पावती दिली. परंतु रोख पैसे दिले नाही. चार दिवसानंतर पैसे देणार असल्याचे सांगितले. मात्र त्यानंतर पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागली. एक महिना झाला तरी पैसे मिळत नसल्याचे आपली फसवणूक झाल्याचे शेतकऱ्याच्या लक्षात आले. त्यांनी १२ जून रोजी उमरखेड पोलीस ठाणे आणि उमरखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत तक्रार दिली. या तक्रारीवरून बाजार समिती सभापती व संचालक मंडळाने बाजार समितीचे कृषी निरीक्षक आ.द. जगताप यांची याप्रकरणी चौकशी अधिकारी म्हणून नेमणूक केली. चौकशीअंती ५ जुलैला अहवाल दिला. या अहवालात सागर बदलवा हे बाजार समितीचे परवानाधारक खरीददार असल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्यांनी १ आॅक्टोबर २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत ९६० क्विंटल सोयाबीन व १४० क्विंटल हरभरा खरेदी केल्याचे पुढे आले. मारोतराव वानखडे यांचे ७ लाख ८२ हजार, उत्तमराव पाटील यांचे ५७ हजार २२४, प्रकाश वानखडे यांचे ४९ हजार २०२ रुपये, प्रकाश आबाजी वानखडे यांचे १ लाख ४६ हजार ४७० असा एकूण १० लाख ३५ हजार ८१८ रुपयांची फसवणूक केल्याचे पुढे आले. याप्रकरणी बाजार समितीचे सचिव अशोक कनवाळे यांच्या तक्रारीवरून सहा व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला. (वार्ताहर)