शहरापासून पाच किलोमीटर अंतरावरील गणेशपूर येथे शनिवारी एका मुलीचा विवाह नियोजित होता. त्यामुळे गावातील ग्राम कोरोना समितीने विवाहस्थळी भेट दिली. तेथे समितीला मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आढळली. समितीने समारंभ सुरू होण्यापूर्वी वधुपित्याशी संपर्क साधून तहसीलदारांची लेखी परवानगी घेऊन मर्यादित नागरिकांच्या उपस्थितीत समारंभ उरकावा, अशी नोटीस बजावली.
नोटीस बजावूनही विवाहात गर्दी झाली. माहिती मिळताच तहसीलदार सुभाष जाधव, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, पीएसआय आर.के. पुरी, हवालदार आकाश जयस्वाल आदींनी गावात धडक दिली. नंतर वरिष्ठांच्या सूचनेनुसार तलाठी ज्योतीराम राठोड, पोलीस पाटील श्याम गावंडे, ग्रामसेवक देवानंद इरेगावकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून गर्दी जमविण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई उपविभागीय अधिकारी जयंत देशपांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.