यवतमाळ : पोलीस मुख्यालयात जिल्ह्यातील ठाणेदारांची क्राईम मिटींग शनिवारी पार पडली. जिल्ह्यातील गुन्हेगारी व कायदा व सुव्यवस्थेचा जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी आढावा घेतला. गेली अनेक महिने क्राईम मिटींग सकाळपासून रात्री उशिरापर्यंत चालायची. परंतु एसपींच्या खुर्चीतील चेहरा बदलल्यानंतर अवघ्या दीड-दोन तासात ही बैठक संपत असल्याने ठाणेदारांनाही दिलासा मिळाल्याचा सूर ऐकायला मिळतो आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक एक-दोन अपवाद वगळता शांततेत पार पडली. मात्र निकालानंतर २४ तासातच जिल्ह्यात खुनाच्या चार व खुनाच्या प्रयत्नाची एक घटना घडली. शिवाय यवतमाळ शहरात गेल्या आठवड्यात मंगळसूत्र चोरीच्या घटना घडल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. पेट्रोलिंग व सतर्कतेद्वारे होणाऱ्या गुन्ह्यांना आधीच प्रतिबंध घालणे आणि तरीही गुन्हा घडल्यास तो तातडीने उघडकीस आणणे, यावर भर देण्याच्या सूचना एसपींनी ठाणेदारांना केल्या.
‘एसपीं’कडून गुन्हेगारीचा आढावा
By admin | Published: February 26, 2017 1:12 AM