सुरेंंद्र राऊत, यवतमाळ : जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ दिल्याची घोषणा प्रशासनाने केली. मात्र मोजक्याच शेतकऱ्यांना याचा लाभ झाला आहे. अनेक शेतकऱ्यांना अत्यंत तोकडी रक्कम मिळाली आहे. यामुळे शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला आहे. शिवसैनिक व शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिक्षकांसमोरच रिलायन्स विमा कंपनीच्या अधिकाऱ्याला बेदम मारहाण करीत चेहऱ्याला काळे फासले आहे. ही घटना यवतमाळ तालुक्यातील यावली येथे मंगळवारी दुपारी घडली.
जिल्ह्यात पीकविमा नुकसान भरपाईचा माेबदला केवळ ५९ हजार शेतकऱ्यांना मिळालेला आहे. त्यापैकी नऊ हजार ७२७ शेतकऱ्यांना एक हजार रुपये पेक्षा कमी नुकसान भरपाई मिळाली आहे. तर ७८ शेतकऱ्यांना केवळ पीक नुकसान भरपाई म्हणून १० रूपये पीकविमा कंपन्यांनी दिले आहे. शेतकरी संकटात असतांना पिक विमा कंपनी शेतकऱ्यांची थट्टा करत आहे. यामुळे संतपालेल्या शेतकरी व ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी कृषी अधिकाऱ्यासमाेरच विमा कंपनी अधिकारी यांचा समाचार घेतला. जाब विचारा केलेल्या अपमानाचा वचपा म्हणून थेट रिलायन्स इंन्शूरन्सचे जिल्हा प्रभारी कुशवाहल यांच्या ताेंडाला काळे फासले. यावेळ शिवसैनिक किशाेर इंगळे, संजय रंगे यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक माेठ्या संख्येने उपस्थित हाेते.