लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेली नक्षलभत्ता थकबाकी पंचायत समितीला प्राप्त होऊनही ती शिक्षकांच्या खात्यात जमा न झाल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारपासून पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला मोठे यश मिळाले असून अखेर शिक्षकांच्या खात्यात चार कोटी ७० लाख रूपये जमा करण्यात आले.सन २००६ पासून देय असलेल्या नक्षलग्रस्त भत्त्याची थकबाकी अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. दीड महिन्यापूर्वी पंचायत समितीला त्यापोटी तीन कोटी ९० लाख रूपये प्राप्त झाले होते. मात्र प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ही रक्कम शिक्षकांना मिळाली नाही. त्यामुळे जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हाध्यक्ष राजुदास जाधव यांच्या नेतृत्वात मंगळवारपासून बेमुदत आंदोलन सुरू केले होते. जिल्हा परिषद अध्यक्ष माधुरी आडे यांनी शिक्षक संघाची मागणी तत्काळ मान्य करण्याचे निर्देश गटविकास अधिकाऱ्यांना दिल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा गतीमान झाली.आंदोलनाला पंचायत समिती सभापती सूर्यकांत जयस्वाल, माजी नगराध्यक्ष अनिल आडे आदींनी भेट दिली. मात्र संघटनेने थकबाकी आणि मार्चचे वेतन अदा होईपर्यंत माघार न घेण्याची भूमिका घेतली. शेवटी प्रशासनाने नमती भूमिका घेत बुधवारी शिक्षकांच्या खात्यात चार कोटी ७0 लाख रूप्ये जमा केले. नंतर बीडीओ सी.जी. चव्हाण, गटशिक्षणाधिकारी रावसाहेब जुमनाके यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष सुरेश पवार, सचिव गजानन ठाकरे, बबन मुंडवाईक, नुरूउल्ला खान, विश्वंभर उपाध्ये, रवी चिद्दरवार, महेश ुदुल्लरवार, आसाराम चव्हाण, सुधीर कोषटवार, सुनील लिंगावार, रामप्रकाश पवार, अनिल घुले, अनिल भालेराव, किशोर देशमुख, टी.डी. चव्हाण, प्रेम राठोड उपस्थित होते.
शिक्षकांच्या खात्यात पावणेचार कोटी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 10:39 PM
गेल्या नऊ वर्षांपासून प्रलंबित असलेली नक्षलभत्ता थकबाकी पंचायत समितीला प्राप्त होऊनही ती शिक्षकांच्या खात्यात जमा न झाल्याने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक संघाने मंगळवारपासून पंचायत समितीसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते.
ठळक मुद्देआंदोलनाचे यश : आर्णी येथे शिक्षक संघाचे बेमुदत उपोषण