लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : सेंट्रल बँकेने दत्तक घेतलेल्या बंदी भागातील शेतकरी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज घेऊन सोमवारी येथील बँकेत धडकल्याने एकच गर्दी झाली आहे. अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख १५ सप्टेंबर असल्याने बँकेत सकाळी ७ वाजतापासूनच शेतकºयांनी रांगा लावल्या होत्या.उमरखेड तालुक्यातील बंदी भागातील गाडीबोरी, थेरडी, जवराळा, परोटी, जेवली, सोनदाबी, एकंबा, दराटी, खरबी बंदी, टाकळी ही गावे सेंट्रल बँकेने दत्तक घेतली आहे. या गावातील सर्व शेतकºयांना सेंट्रल बँकेमधूनच कर्ज दिले जाते. यावर्षी शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. त्यानंतर शेतकºयांनी आॅनलाईन कर्ज भरले. आता हे अर्ज बँकेत सादर करण्यासाठी शेतकरी एकाच वेळी धडकले आहे.अवघे तीन दिवस राहिल्याने बंदी भागातून शेकडो शेतकरी सोमवारी उमरखेडमध्ये दाखल झाले. काही जण तर रविवारी रात्रीपासूनच मुक्कामी आले होते. सोमवारी सकाळी ७ वाजतापासून या शेतकºयांनी बँकेपुढे रांगा लावल्या. गेल्या काही दिवसांपासून आॅनलाईन अर्ज भरण्याचा त्रास सहन करून हे शेतकरी आता बँकेपुढे रांगा लावून आहेत. बंदी भागातील शेतकरी सुमारे ७० किलोमीटर अंतरावरून येथे आले आहे. उपाशी आणि पाण्याविना तासन्तास रांगेत ताटकळत आहेत. एकाच दिवशी झालेल्या या गर्दीमुळे बँकेचे नियोजनही कोलमडले आहे. विशेष म्हणजे इतर शेतकºयांना आपले अर्ज सोसायटीमार्फत सादर करावे लागतात. परंतु बंदी भागातील गावे सेंट्रल बँकेने दत्तक घेतली असून त्यांना थेट बँकेमार्फतच कर्ज सुविधा उपलब्ध करून दिली जाते. त्यामुळे कर्जमाफीचे अर्जही या शेतकºयांना थेट बँकेतच सादर करावे लागत आहे. आता अवघे तीन दिवस उरल्याने बंदी भागातील शेतकरी उमरखेडच्या सेंट्रल बॅकेसमोर रांगा लावून आहेत. यामध्ये महिला आणि पुरुषांचाही समावेश आहे.उमरखेड तालुक्याच्या बंदी भागातील शेतकºयांना सेंट्रल बँकेतून थेट कर्ज मिळते. त्यामुळे त्यांना कर्जमाफीसाठीही आॅनलाईन भरलेले अर्ज येथेच दाखल करावे लागत आहे. आतापर्यंत शेतकरी आले नाही. परंतु आता तीन दिवस उरल्याने बँकेत गर्दी झाली आहे.- ए.आर. कनोर,व्यवस्थापक, सेंट्रल बँक
कर्जमाफीच्या अर्जासाठी बँकेत गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:16 PM
सेंट्रल बँकेने दत्तक घेतलेल्या बंदी भागातील शेतकरी कर्जमाफीचे आॅनलाईन अर्ज घेऊन सोमवारी येथील बँकेत धडकल्याने एकच गर्दी झाली आहे.
ठळक मुद्देउमरखेड सेंट्रल बँक : बंदी भागातील नागरिक धडकले