लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना मिशन मोडवर राबविण्यात आली. राज्यात सर्वाधिक शेततळे खोदण्याचा बहुमान यवतमाळ जिल्ह्याला मिळाला. आता पावसात खंड पडल्यामुळे संकटात सापडलेली पिके वाचविण्यासाठी शेतकरी याच शेततळ्यातील पाण्याचा वापर करून सिंचन करत आहे. शेततळे खऱ्या अर्थाने पिकांसाठी संजीवनीचे काम करत आहे.दुष्काळग्रस्त आणि शेतकरी आत्महत्या यामुळे गाजत असलेल्या जिल्ह्यात पाय ठेवताच जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी सर्व प्रथम महत्त्वाकांक्षी शेततळे योजना हातात घेतली. या योजनेतून आतापर्यंत सहा हजार ४७८ शेततळे पूर्ण करण्यात आले. ८० शेततळ्यांचे अजूनही काम सुरू आहे. पहिल्याच पावसात शेततळे तुडुंब भरले आहे. पावसाचा अंदाज घेत खरिपाची पेरणी केली. मात्र नेहमीप्रमाणे पावसाने यावर्षीही दगा दिला. जिल्ह्यातील काही भागात दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. अशाही स्थितीत ज्या शेतकऱ्यांनी शेततळ्याचा लाभ घेतला त्यांनी तळ्यातील पाण्यातून हंगामी सिंचनाला सुरुवात केली. स्प्रिंकलरच्या सहायाने पिकांना खंड पडलेल्या काळात वाचविण्यात शेतकºयांना यश आले आहे. शासकीय योजना राबवल्यानंतर काही आठवड्यातच त्याचे सकारात्मक परिणाम येण्याचे हे पहिलेच उदाहरण आहे. अनेक शेतकऱ्यांना शेततळ्यामुळे दुबार पेरणीच्या संकटातून सुटका मिळाली आहे. हंगामी सिंचन होत असले तरी नेमक्या पेरणीच्या काळात शेततळ्यातील पाण्याचा वापर करता येतो. अनेक शेतकऱ्यांनी आॅईल इंजीन बसवून सिंचन सुरू केले आहे. आता त्यांचे पीक जमिनीबाहेर आले असून हिरवे स्वप्न साकार होताना दिसत आहे.
शेततळ्याच्या सिंचनातून पिकांना संजीवनी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 11:33 PM
जिल्ह्यात मागेल त्याला शेततळे ही योजना मिशन मोडवर राबविण्यात आली. राज्यात सर्वाधिक शेततळे खोदण्याचा बहुमान यवतमाळ जिल्ह्याला मिळाला. आता पावसात खंड पडल्यामुळे संकटात सापडलेली पिके वाचविण्यासाठी शेतकरी .......
ठळक मुद्देयोजनेचा प्रत्यक्ष लाभ : यवतमाळ जिल्हा ठरला राज्यात अव्वल