लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल नऊ हजार ३३० हेक्टरवरील पिकांचे पाच कोटी ५९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात एक हजार ३७२ घरांची पडझड झाली असून १८९ कुटुंबांना नऊ लाख ४५ हजार रुपये तात्पुरती मदत देण्यात आली.तालुक्यात १५ व १६ आॅगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अडाण नदी, पाझर तलाव व नाल्याकाठच्या गावांना मोठा फटका बसला. तालुक्यातील सर्वात मोठ्या अडाण धरणाने पातळी गाठल्यामुळे धरणाचे पाच दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे अडाण नदीला पूर आल्याने नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरले. रामगाव (रामेश्वर), सांगवी (रेल्वे), बोदेगाव, तरनोळी, नखेगाव, घनापूर, लालापूर, फुबगाव, डोल्हारी आदी गावातील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. डोल्हारीचे प्रमोद खाडे, लालापूरचे गणेश इंगोले यांच्यासह गावातील इतर शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.तेलगव्हाण येथील पाझर तलाव फुटल्यामुळे जवळपासच्या ५० हेक्टरवरील शेतीत पाणी शिरले. तोरणाळा येथील तीन माती बंधारे वाहून गेले. त्यामधील पाण्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. भांडेगाव येथील देवराव चव्हाण यांच्या शेतातील पिके खरडून गेली. हातणी येथील किसन वांड्रसवार यांनी मोठा खर्च करून आपल्या शेतात केळीची लागवड केली होती. अतिवृष्टीमुळे त्यांचा पूर्ण खर्च वाया गेला. तसेच गुलाब अंबुरे, नंदकिशोर बारसे यांचेसुद्धा प्रचंड नुकसान झाले.चोरखोपडी पाझर तलाव तुडुंब भरला असून कोणत्याही क्षणी फुटण्याची भीती आहे. या गावातील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. त्याचबरोबर तालुक्यातील अनेक गावांमधील कापूस, सोयाबीन, तूर, मूग, उडीद यासह फळबाग उध्वस्त झाली. तसेच घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पूर्णत: बाधित कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपाची मदत करण्यात आली आहे.घरांचे व शेतीच्या नुकसानीचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने नुकसानीची अंदाजित आकडेवारी वरिष्ठांना पाठविली आहे. परंतु मोठ्या प्रमाणात नुकसान असल्यामुळे पूर्ण सर्वेक्षणाअंतीच नुकसानीचा अंतिम आकडा कळेल, असे सांगण्यात आले.तात्पुरती मदतमहसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी अतिवृष्टीमुळे जास्त प्रमाणात नुकसान झालेल्या गावांना भेट देऊन पाहणी केली. नुकसानग्रस्तांना तत्काळ तात्पुरत्या स्वरूपाची मदत देऊन सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
दारव्हात साडेपाच कोटींचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2018 12:10 AM
तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तब्बल नऊ हजार ३३० हेक्टरवरील पिकांचे पाच कोटी ५९ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तालुक्यात एक हजार ३७२ घरांची पडझड झाली असून १८९ कुटुंबांना नऊ लाख ४५ हजार रुपये तात्पुरती मदत देण्यात आली.
ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका : ३७२ घरांची पडझड