संतोष कुंडकर ।लोकमत न्यूज नेटवर्कवणी : वणी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जंगलात मोठ्या प्रमाणावर रानडुक्कर व रोह्यांची संख्या आहे. जंगलाला लागून असलेल्या शेतशिवारात या दोनही प्राण्यांचा कायम धुडगूस असून गेल्या चार वर्षात या वन्यप्राण्यांनी शेतकऱ्यांचे २० कोटी २९ लाख ६४ हजार २३१ रूपयांचे नुकसान केले आहे. यात कापूस, सोयाबीन, तूर ही पिके या वन्यप्राण्यांनी नेस्तनाबूत केली आहे.वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. सामान्य शेतकरी पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. यातूनच शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षात एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रोही, रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये धुडगूस घालून एक लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान केले. सन २०१६-१७ मध्ये चार लाख नऊ हजार ९५० रूपयांचे नुकसान झाले. सन २०१७-१८ मध्ये २० कोटी १६ लाख ४६ हजार, २०१८-१९ मध्ये सहा लाख ५६ हजार ४१, तर सन २०१९ ते जानेवारी २०२० पर्यंत ६७ हजारांचे नुकसान झाल्याची नोंद वनविभागाच्या दप्तरी आहे. चार वर्षात असे एकूण २० कोटी २९ लाख ६४ हजार २३१ रूपयांचे नुकसान झाले.पूर्वी जंगलांमध्ये वन्यप्राणी होते. या वन्यप्राण्यांच्या शिकारीही मोठ्या प्रमाणावर केल्या जायच्या. परंतु पुढे वनविभागाच्या कठोर कायद्याची अंमलबजावणी सुरू झाली. परिणामी शिकारीवर बंधने आलीत. वन्यजीवांच्या रक्षणासाठी वनविभागाने कठोर पाऊल उचलले. यातून वन्यप्राण्यांची संख्याही वाढत गेली. वनसंवर्धनासाठी वन्यजीवांचा साखळी संतुलीत राहावी, यासाठी प्रयत्न होत असले तरी रोही, रानडुकरांसारख्या प्राण्यांची झालेली वाढ मात्र शेतकºयांसाठी चांगलीच डोकेदुखी ठरली.गेल्या काही वर्षात वन्यप्राण्यांनी शेतशिवारात प्रचंड धुमाकूळ चालविला. शेतात पीक वाढले की, रोही, रानडुक्कर हे वन्यप्राणी कळपाने शेतात शिरून पिकांची नासाडी करत आहे. त्यातून शेतकºयांना मोठे नुकसान सोसावे लागत आहे. मात्र ज्या प्रमाणात नुकसान होते, त्या प्रमाणात भरपाई मिळत नाही.वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी विविध क्लृप्त्यावन्यजीवांच्या धुमाकूळामुळे पिकांचे नुकसान होत आहे. असे असले तरी या प्राण्यांना कायद्यानुसार ठार मारता येत नाही. त्यामुळे शेतकरी या प्राण्यांच्या बंदोबस्तासाठी विविध युक्त्या वापरत आहे. अनेक ठिकाणी रंगीबेरंगी साड्यांचे कुंपण केल्याचे दिसून येते.
वन्यप्राण्यांमुळे २० कोटींवर नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2020 6:00 AM
वन्यप्राण्यांच्या धुमाकूळामुळे शेतकरी वर्ग प्रचंड त्रस्त आहे. वन कायद्यामुळे शेतकऱ्यांना या वन्यजीवांचा बंदोबस्तही करता येत नाही. सामान्य शेतकरी पिकांचे रक्षण करण्यास असमर्थ ठरतो. यातूनच शेतकऱ्यांना गेल्या चार वर्षात एवढ्या मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षात रोही, रानडुक्कर या वन्यप्राण्यांनी पिकांमध्ये धुडगूस घालून एक लाख ८५ हजार रूपयांचे नुकसान केले.
ठळक मुद्देचार वर्षातील आकडेवारी : वनविभागाने शेतकऱ्यांना अदा केली नुकसान भरपाई