शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

दुष्काळग्रस्तांसाठी ‘दान महोत्सव’

By admin | Published: April 09, 2016 2:41 AM

गुढीपाडव्याच्या दिवशी यवतमाळकरांनी दुष्ककाळग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘दान महोत्सव’ हा उपक्रम राबविला.

कपड्यांची मदत : गुढीपाडव्याला यवतमाळात सरसावले शेकडो हातयवतमाळ : गुढीपाडव्याच्या दिवशी यवतमाळकरांनी दुष्ककाळग्रस्तांना मदत करण्यासाठी ‘दान महोत्सव’ हा उपक्रम राबविला. तब्बल दीड हजार नागरिकांनी कपड्यांचे दान करून मदतीचा हात पुढे केला. दुष्काळग्रस्तांच्या पाठिशी समाज खंबीरपणे उभे असल्याचा संदेश यातून देण्यात आला. हे कपडे बिड आणि उस्मानाबाद जिल्ह्यात वाटप केले जाणार आहेत. या उपक्रमासाठी घाटंजीमधील श्रमसाफल्य संस्थेने पुढाकार घेतला. तसेच अस्तित्व फाऊंडेशन, दिलासा संस्था आणि आधार फाऊंडेशनच्या सहकार्याने दान महोत्सव राबविण्यात आला. शुक्रवारी पहाटेपासूनच शहरातील विविध भागात जुने कपडे गोहा करण्यासाठी स्टॉल लावण्यात आले होते. शहरातील दत्त चौक, आर्णी नाका, दर्डा चौक आणि स्टेट बँक चौकात हे स्टॉल्स लावण्यात आले होते.या स्टॉलवर छोट्या मुलापासून मोठ्या मुलांपर्यंतचे कपडे, साडी, लुगडे, धोतर, पँट्स, चादर, ब्लँकेट दान देण्यात आले. या स्टॉलवर दीड हजार नागरिकांनी कपडे दिले. जवळपास ५०० पोत्यांमध्ये हे कपडे गोळा करण्यात आले. यशस्वीतेसाठी श्रमसाफल्य संस्थेचे अमित पडलपवार, आधार फाऊंडेशनचे अध्यक्ष राजू पडगीलवार, अस्तित्व फाऊंडेशनच्या अलका कोथळे, संगीता घुईखेडकर, लता खांदवे, नीलिमा राऊत, कीर्ती राऊत, डिंपल नक्षणे, पुष्पा तिडके, मनीषा काटे, कविता बोरकर, करुणा धणेवार, रिया कैपिल्यवार, रितू गायकवाड, ज्योत्स्ना भांगे, सरोज बरदेवे, समाजकार्य महाविद्यालय, दिलासा संस्था, शिवसमर्थ ढोलताशा पथकाचे सहकार्य लाभले. (शहर वार्ताहर)