शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जागतिक हवामान बदलामुळे धोक्याची घंटा; यवतमाळातून ‘वसुंधरा बचाव’ यात्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2017 10:33 AM

हवामान बदलामुळे मानव जातीलाच धोका निर्माण झाला आहे. जगातील १८४ देशांमधील १५ हजार शास्त्रज्ञांनी याबाबत इशारा देऊन पृथ्वीच्या रक्षणाची आर्त हाक दिली. त्यासाठी यवतमाळातून ‘वसुंधरा बचाव’ ही प्रबोधन संवाद यात्रा सुरू करीत असल्याचे अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.

ठळक मुद्दे१५ हजार शास्त्रज्ञांचा इशारा :

आॅनलाईन लोकमतयवतमाळ : हवामान बदलामुळे मानव जातीलाच धोका निर्माण झाला आहे. जगातील १८४ देशांमधील १५ हजार शास्त्रज्ञांनी याबाबत इशारा देऊन पृथ्वीच्या रक्षणाची आर्त हाक दिली. त्यासाठी यवतमाळातून ‘वसुंधरा बचाव’ ही प्रबोधन संवाद यात्रा सुरू करीत असल्याचे अर्थतज्ज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनी यवतमाळ येथे आयोजित पत्रपरिषदेत सांगितले.शेतकरी आत्महत्या आणि आता कीटकनाशकांच्या विषबाधेमुळे जिल्ह्यात शेतकऱ्यांचे बळी जात असल्याने संपूर्ण जगाचेच लक्ष यवतमाळवर केंद्रित झाल्याचे सांगून राज्य दुष्काळ निर्मूलन मंडळाचे उपाध्यक्ष आणि ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ प्रा. देसरडा म्हणाले, दुष्काळ, महापूर, त्सुनामी, चक्रीवादळ, वणवे ही मानवनिर्मित संकटे आहेत. याचे मूळ कारण जीवाष्म इंधन (फॉसिल फ्युएल) आहे. यावर आधारित कोळसा, पेट्रोल, डिझेल, गॅस ही ऊर्जा स्त्रोते आहेत. यामुळे जैवविविधतेचा लोप होत आहे. परिणामी मानवाचे भरणपोषण आणि आरोग्याला धोका निर्माण झाला. यावर वेळीच उपाय न शोधल्यास पृथ्वीसह मानवाचा सर्वनाश होण्याचा धोका आहे, असे प्रा. देसरडा म्हणाले.सध्या देशातील शेती संकटात असून रासायनिक आणि औद्योगिक शेती हे त्याचे मूळ कारण आहे. शेतकरी परावलंबी झाला आहे. केवळ कंपन्यांच्या फायद्यासाठी शेतकऱ्यांचा बळी देणारी व्यवस्था निर्माण झाली आहे. यातून वसुंधरेच्या अस्तित्वालाच आव्हान निर्माण झाले असून त्याचा पहिला फटका शेतकरी आणि मानवी जीवनाला बसणार आहे. जगातील १८४ देशांमधील तब्बल १५ हजार ३६१ शास्त्रज्ञांनी हवामान बदल ही मानवी समाजासमोरील अव्वल समस्या असल्याचा इशारा दिला आहे. कर्ब आणि अन्य विषारी वायूंच्या बेसुमार उत्सजर्नामुळे तापमान वाढीचा इशारा शास्त्रज्ञांनी दिला. त्यामुळे वसुंधरा व मानव जातीला वाचविण्यासाठी समतामूलक शाश्वत मार्ग स्वीकारण्याचे आवाहन देसरडा यांनी केले.

राज्यकर्त्यांची फोडा आणि झोडा नीतीधनदांडग्यांच्या मस्तवाल आणि चंगळवादी जीवनशैलीला तत्काळ थांबविण्याची गरज प्रा. देसरडा यांनी व्यक्त केली. बुद्ध, फुले, गांधी, आंबेडकर यांच्या सम्यक विचारानेच विषमता, विसंवाद, विध्वंस आदी संकटांचा मुकाबला शक्य आहे.मात्र, दुर्र्दैवाने या महापुरुषांना एकमेकांविरूद्ध उभे करून जनतेत फूट पाडली जाते व त्यातून राज्यकर्त्यांचे फावते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आजी आणि माजी सर्वच राज्यकर्ते तोडा-फोडा नितीचा अवलंब करीत आले असून आताही सत्ताधारी तेच तंत्र अवलंबत असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :environmentवातावरण