मार्डी : मार्डी बोदाड (केगाव) या मार्गावर बेंबळा कालवे प्रकल्पअंतर्गत कालवा खोदून त्यावर पुल बांधण्यात आला. मात्र पुलाच्या दोन्ही बाजुला खोल खड्डे पडल्यामुळे वाहन चालकांसाठी धोकादायक असून अपघात घडत आहे. बेंबळा कालव्याचे बांधकामानंतर त्यावर पुलाचे बांधकाम झाले. पुलाचे बांधकाम व रोड या दरम्यान योग्यरित्या डांबरीकरण न झाल्यामुळे पावसाळ्यात खोल खड्डे पडले आहेत. त्यामुळे या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहन चालकांना धोकादायक ठरत असून काही वेळा अपघात सुद्धा होत आहे. तेव्हा वाहनचालकांच्या सुरक्षिततेसाठी संबंधित जबाबदार बेंबळा प्रकल्प अधिकारी वा जिल्हा परिषद बांधकाम विभाग यांनी खड्डे भरून डांबरीकरण करावे, अशी जनतेची मागणी आहे. (वार्ताहर)
मार्डी-बोदाड पुलावर धोकादायक खड्डा
By admin | Published: September 03, 2016 12:32 AM