लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव(देवी) : जिल्हा प्रशासनाने कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंध उपाययोजनेंतर्गत १४४ कलम लागू केले आहे. सर्वत्र संचारबंदी आहे. जिल्हाच नव्हे तर देशात लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. यामुळे परवानाधारक देशी दारू दुकाने, विदेशी दारूची दुकाने, रेस्टॉरंट, वाईनबार पूर्णत: बंद आहेत. याचाच फायदा अवैध दारू गाळप करणारे घेत आहेत. आसेगाव देवी येथे संयुक्त पोलीस पथकाने बेड्यावर धाड टाकून मोहा माच व इतर साहित्य जप्त केले.सर्वत्र दारूबंदी असल्याने अवैध दारूचे गाळप मोठ्या प्रमाणात होत आहे. परवानाधारक दारू दुकाने बंद असल्याने ही व्यावसायिक संधी कॅश करण्याकरिता दारूमाफिया सरसावला आहे. ग्रामीण भागात घराघरात दारू गाळण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे दारूबंदीच्या काळात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. शहरासह ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे. पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी म्हणून अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली आहे. आसेगाव(देवी) येथील बेड्यावर सहसा पोलीस जाणे टाळतात. यामुळे बुधवारी संपूर्ण फौजफाटा घेऊन कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेसह ग्रामीण पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचारी मिळून ५० जणांनी धाड टाकली. या धाडीत मोहा माचाचा सडवा असलेले ड्रम पोलिसांनी नष्ट केले. हा सडवा फेकून देण्यात आला. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना प्रशासनाला विशेष खबरदारी घ्यावी लागत आहे. त्यात अवैध दारू ही सर्वातमोठी घातक ठरणारी गोष्ट आहे. शासनाने अधिकृत दारू विक्रीबाबत निर्णय घ्यावा, असाही सूर उमटत आहे. अवैध दारू विक्री करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश वरिष्ठांकडून मिळाले आहे. त्यामुळे घरात किंवा शेतात दारू गाळणाºयांवर फौजदारी कारवाई निश्चित मानली जात आहे. गणेश तुमचंद पवार (४०), जोगीन गणी पवार, सुधीर तेमा भोसले, छगन कांदेदास काळे, दिसराज रामनाथ काळे, सोनेसेठ मुजराम भोसले, किशोर तुपचंद पवार यांच्याविरूद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ग्रामीण पोलीस ठाण्यातील सहायक निरिक्षक गजानन करवाडे, राजू काळे, रेमसिंग आडे, संजय राठोड, टोळी विरोधी पथकाचे प्रमुख मिलन कोयल, सहायक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण, प्रमोद पाचकवडे, उपनिरीक्षक मंगेश भोयर, सचिन पवार यांनी केली. या कारवाईत उपसरपंच गिरिष टप्पे, पोलीस पाटील आशीष राऊत, दीपक ठवरे, विवेक तडस्कर, सचिन चव्हाण, गजानन कोळमकर, रवी आंबिलकर, अमोल गावंडे, रमेश तुरस्कार, रंगारी, डोफे आदी ग्रामस्थही सहभागी झाले होते.
अवैध दारू अड्ड्यांवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2020 6:00 AM
सर्वत्र दारूबंदी असल्याने अवैध दारूचे गाळप मोठ्या प्रमाणात होत आहे. परवानाधारक दारू दुकाने बंद असल्याने ही व्यावसायिक संधी कॅश करण्याकरिता दारूमाफिया सरसावला आहे. ग्रामीण भागात घराघरात दारू गाळण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे दारूबंदीच्या काळात अवैध दारू विक्रीला उधाण आले आहे. शहरासह ग्रामीण भागातही हीच स्थिती आहे.
ठळक मुद्देपोलिसांची संयुक्त कारवाई : स्थानिक गुन्हे शाखेसह ग्रामीण पोलिसांचे पथक