लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : शेतात ओलित करताना विजेचा जबर धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कवठा बु. येथे रविवारी घडली. लोंबकळणाऱ्या वीज तारांनी शेतकऱ्याचा घात केला. शेतकऱ्याच्या नातेवाईकांनी वीज वितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा आरोप केला.राजू रामकृष्ण जुनघरे (४०) रा. कवठा बु. असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ते आपल्या शेतात रविवारी ओलित करीत होते. ओलित करताना लोखंडी पाईप उचलताना तुटलेल्या वीज तारेला स्पर्श झाला. त्यामुळे त्यांना जबर धक्का बसला. काही वेळातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेला वीज वितरण कंपनीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत संबंधित अधिकाºयांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. त्याच्या मागे पत्नी, दोन मुली, आई-वडील असा आप्त परिवार आहे.दरम्यान वीज वितरण कंपनीचे अभियंता सौरभ नैताम यांनी पारवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यात विलास वामनराव जुनघरे यांनी माझा पुतण्या तुमच्या हलगर्जीपणामुळे मरण पावला, असे म्हणत धक्काबुक्की केल्याचे म्हटले आहे. त्यावरून पारवा पोलिसांनी विलास जुनघरेविरुद्ध गुन्हा केला आहे. या घटनेने वीज वितरणविरुद्ध रोष व्यक्त होत आहे.
ओलित करताना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 10:04 PM
शेतात ओलित करताना विजेचा जबर धक्का लागल्याने एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील कवठा बु. येथे रविवारी घडली.
ठळक मुद्देकवठाची घटना : लोंबकळणाऱ्या तारांनी घात