लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनाने यवतमाळसह पांढरकवडा, नेर आणि दारव्हा या चार शहरात २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून ३१ जुलैपर्यंत संचारबंदी घोषित केली आहे. ही वार्ता कळताच गुरुवारी यवतमाळच्या बाजारपेठेत नागरिकांनी खरेदीसाठी मरणाची गर्दी केली होती.मेनलाईनमधील सावकारपेठेत तर या गर्दीमुळे वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती. मारवाडीपुरा, बालाजी चौक, टांगा चौक, आर्णी रोड, दत्त चौक, इंदिरा गांधी मार्केट, नेताजी चौक या प्रमुख बाजारपेठांमध्ये प्रचंड गर्दी पहायला मिळाली.दरम्यान संचारबंदीच्या सात दिवसात केवळ दवाखाने व औषधी केंद्र सुरू राहणार आहे. दूध विक्रेत्यांना काही तासांची सवलत राहणार आहे. अत्यावश्यक बाबी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने गुरुवारीच खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शनिवारी येणारा नागपंचमीचा सण, त्यानंतर लगेच १ ऑगस्ट रोजी ईद आणि काही दिवसातच येणारा रक्षाबंधनाचा सण लक्षात घेऊन नागरिकांनी खरेदीची घाई चालविली आहे. संचारबंदीत सण, उत्सवाची खरेदी करता येणार नाही या भीतीपायी गुरुवारी बाजारपेठेत प्रत्येकाने धाव घेतली होती. या गर्दीत सोशल डिस्टन्सिंगचा बोजवारा उडाला. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूसाठी झालेली गर्दी नागरिकांना कोरोनाच्या संसर्गाकडे खेचणार तर नाही, अशी भीती आहे.केवळ आज दुकाने सायंकाळी ५ वाजेपर्यंतयवतमाळ, पांढरकवडा, नेर, दारव्हा शहरात २४ जुलैच्या मध्यरात्रीपासून ३१ जुलैपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे. या दरम्यान सर्वसामान्यांची अडचण होऊ नये म्हणून २४ जुलै रोजी बाजारपेठ सकाळी १० ते सायंकाळी ५ पर्यंत उघडी राहणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले.
शहरात जगण्यासाठी मरणाची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 5:00 AM
संचारबंदीच्या सात दिवसात केवळ दवाखाने व औषधी केंद्र सुरू राहणार आहे. दूध विक्रेत्यांना काही तासांची सवलत राहणार आहे. अत्यावश्यक बाबी वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याने गुरुवारीच खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. शनिवारी येणारा नागपंचमीचा सण, त्यानंतर लगेच १ ऑगस्ट रोजी ईद आणि काही दिवसातच येणारा रक्षाबंधनाचा सण लक्षात घेऊन नागरिकांनी खरेदीची घाई चालविली आहे.
ठळक मुद्देयवतमाळात सात दिवस लॉकडाऊन : बाहेर निघू नका, घरीच सुरक्षित राहा