यवतमाळ : शहरातील चर्च समोरील संगम चौकात जीवन प्राधिकरणाच्या वतीने पाईपलाईनचे काम सुरू आहे. सातत्याने रस्त्याच्या मधोमध मोठमोठे खड्डे खोदले जात आहे. मागील दोन वर्षापासून शहरातील रस्त्यांवर जीवघेणे खड्डे आहेत. सोमवारी सकाळी एका पस्तीस वर्षीय युवकाचा खड्ड्यात पडून मृत्यू झाल्याची घटना उघड झाली.
जीवन प्राधिकरणाच्या कंत्राटदाराकडून कुठलीच सुरक्षेची उपायोजना करण्यात आलेली नाही. शिवाय पाईपलाईनचे काम आराखड्यानुसार होत नसल्याने नागरी वस्तीमध्ये खड्डे खड्डे खोदण्याची वेळ आली आहे. अजूनही सुरू न झालेल्या योजनेच्या देखभाल-दुरुस्ती लाही सुरुवात झाली आहे. एक थेंब पाणी न आल्यानंतरही या योजनेतील भ्रष्टाचारावर कुणीच बोलायला तयार नाही. एकंदरच परिसरातील नागरिकांच्या भावना संतप्त असून संबंधित अधिकारी व कंत्राटदार या विरोधात गुन्हा दाखल केला जावा अशी मागणी होत आहे.